Three arrested in goa theft case Dainik Gomantak
गोवा

Calangute News: सात लाखाचा गांजा बाळगणारे दोघे जेरबंद

कळंगुट पोलिसांनी केली कारवाई

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यात अमली पदार्थविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. याला आता वेग आला असून पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर आज कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथे कारवाई करत सुमारे सात लाखाचा गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

(calangute police arrested two persons at candolim in the possession of drugs)

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात कांदोळी येथे आज कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी आशिष कुमार झा, वय 27, सिरोही राजस्थान व राजन कुमार झा, राजस्थान या दोघा संशयितांना अटक करत त्यांच्यावर एनडीपीएस कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी त्यांच्याकडून 702 ग्रॅम वजनाचा चरस व 1.342 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. याची किमत एकूण 6.90 लाख इतकी होते. यावेळी पोलिसांनी संशयितांचा आणखी कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का? याचा तपास घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना पकडण्याची ही यशस्वी मोहीम पीएसआय विराज नाईक, पीएसआय किरण नाईक, हेडकॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT