Goa Crime: वेश्या व्यवसायासाठी गुजरातच्या महिलेचा वापर, आरोपी महिलेला अटक

वेर्णा पोलिसांनी केली कारवाई
Arrest
ArrestDainik Gomantak

गुजरातमधील 23 वर्षीय महिलेला वेश्या व्यवसायासाठी भाग पाडल्याप्रकरणी वेर्णा येथील निकी डिकोस्टा या महिलेला वेर्णा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेने पिडीतेचा वापर करत पैसे मिळवण्यासाठी हा मार्ग अवलंबला असल्याची माहिती समोर आली आहे.

Arrest
Goa News: मंत्रीचं अंधारात, परिवहन खातं Active मोडमध्ये!

मिळालेल्या माहितीनुसार 10 ऑक्टोबर रोजी पहाटे ही कारवाई केली. या प्रकरणात आरोपी महिला निकी डिकोस्टा राहणार वेर्णाने पैसे मिळवण्याच्या उद्देशाने एका फ्लॅटचा वापर करत कुंटणखाना सुरु केला होता. यावरुन पोलिसांनी वेर्णा येथे छापा टाकला असता या फ्लॅटमध्ये गुजरातमधील 23 वर्षीय महिला असल्याचे आढळले. याबाबत पोलिसांनी अधिक तपास करत मुख्य सुत्रधार असणाऱ्या निकी डिकोस्टा या महिलेला अटक केली आहे.

Arrest
Anant Salkar Passed Away : अनंत साळकर यांचे गोमेकॉला देहदान; अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी

पोलिस निरीक्षक डायगो ग्रेशियस यांनी सांगितले की, संशयीत महिला डिकोस्टा ही बेकायदेशीर कृत्य करत असल्याचे समजताच पोलिसांनी वेर्णा येथील फ्लॅटमध्ये एका डिकॉय ग्राहक असल्याचा बनाव करत पाठवले. आणि पहाटे 1.15 च्या सुमारास फ्लॅटवर छापा टाकून पीडितेची सुटका केली.

आरोपी ही देह व्यापारातून मिळणाऱ्या कमाईवर गुजराण करत असून या फ्लॅटचा वापर कुंटणखान्यासाठी होत होता. असे पोलिसांना तपासात आढळल्याने आरोपी डिकोस्टा या महिलेवर IPC च्या कलम 370 A (2) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, 1956 च्या कलम 3,4,5,6 आणि 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास वेर्णा पोलिस करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com