Calangute Hotel Fraud News Dainik Gomantak
गोवा

120 जण आणि 45 रुम्स; कळंगुटच्या हॉटेलमध्ये मौजमजा केली अन् 9 लाखांचे बिल न देता झाले पसार

संशयित तब्बल 9 लाख रुपयांचे बिल न देता पसार झाले असा हॉटेल नीलमच्या व्यवस्थापकाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Pramod Yadav

Calangute Hotel Fraud News: पाच दिवसांसाठी हॉटेलमध्ये राहून सर्व सेवांचा आस्वाद घेऊन बिलाची उर्वरीत रक्कम न देता पसार झाल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांत चार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संशयित तब्बल 9 लाख रुपयांचे बिल न देता पसार झाले असा हॉटेल नीलमच्या व्यवस्थापकाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी नीलम हॉटेल व्यवस्थापक जेकब जॉन यांनी कळंगुट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार, तरुण अगरवाल (उत्तर प्रदेश), ए. के. गुप्ता, मनीश कासना (रायपूर) आणि रवितेज ऊर्फ प्रशांत कुमार ( म्हैसूर, कर्नाटक) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चौघांनी 8 ते 12 डिसेंबर 2023 या काळात 120 जणांसाठी 45 खोल्या बुक केल्या होत्या. सर्वजण पाच दिवस हॉटेलमध्ये राहिले सर्व सेवांचा आनंद घेतला.

पाच दिवसांसाठी 120 जणांचे 16 लाख रुपये बिल झाले मात्र, त्यातील केवळ 6 लाख रुपये त्यांनी दिले आणि उरलेले पैसे न देता हॉटेलची फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मोपा विमानतळाच्या आवारात ठेवलेला 5.80 लाखांच्या भंगाराची चोरी

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानळ परिसरात ठेवण्यात आलेल्या तब्बल 5.80 लाख रुपये किंमतीच्या भंगाराची चोरी उघडकीस आली आहे. पोलिसांनी समीर हलीमशाह याला अटक केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT