Calangute Shack Dainik Gomantak
गोवा

Calangute Murder: कळंगुट पर्यटक खून प्रकरण; मारेकरी शॅक मालकाचं 31st तुरुंगातच, मुलासह अटक

Calangute Murder Case: गंभीर जखमी झालेल्या तेजाचा कांदोळी येथील रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. या घटनेनंतर शॅक मालक फरार झाला होता.

Pramod Yadav

Calangute Murder Case

म्हापसा: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील मरीना शॅकमध्ये भोला रवि तेजा या आंध्रप्रदेशातील तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवारी उत्तररात्री उघडकीस आली. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी शॅक मालकासह त्याचा मुलगा व दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. शॅक बंद झाल्यानंतर देखील खाद्य पदार्थांची मागणी केल्यावरुन झालेल्या वादात तेजाचा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

शॅक मालक आग्नेल सिल्वेरा (वय ६४) याच्यासह पोलिसांनी शॅक मालकाचा मुलगा शुबर्ट सिल्वेरा (वय २३), अनिल बिस्ता (२४, मूळ नेपाळ) आणि कमल सुनार (२३, मूळ नेपाळ) यांना अटक करण्यात आली आहे.

भोला रवि तेजा त्याचे मित्र आणि शॅकच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. शॅक कर्मचाऱ्यांनी तेजा व त्याच्या मित्रांना मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या तेजाचा कांदोळी येथील रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. या घटनेनंतर शॅक मालक फरार झाला होता.

कळंगुट पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करुन शॅक मालक आग्नेल आणि त्याचा मुलगा व दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, भोला रवि तेजा व त्याचे मित्र मरीना शॅकमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. दरम्यान, त्यांना आणखी खाद्यपदार्थ हवे असताना शॅक बंद झाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. यावरून दोन्ही गटात वाद झाला. व प्रकरण मारहाणीपर्यंत आले.

शॅक कर्मचाऱ्यांनी केलेल्या जबर मारहाणीत भोला रवि तेजा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कांदोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तेजाचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT