Last Accused arrested in Calangute Murder Case Dainik Gomantak
गोवा

Calangute Murder Case: कळंगुट पर्यटक खून प्रकरण; आणखी एका शॅक कामगारास अटक, संशयितांना 9 दिवसांची पोलिस कोठडी

Calangute Murder Case: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर मरीना बीच शॅकवर बोल्लारवि तेजा या हैद्राबाद, तेलंगणा येथील तरुणाचा खून झाला.

Pramod Yadav

Calangute Murder Case

म्हापसा: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी उत्तररात्री दोनच्या सुमारास आंध्र प्रदेशातील पर्यटकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शॅक मालक, त्याचा मुलगा आणि दोन कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर, याप्रकरणात आता आणखी एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अटक चार संशयितांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सुमन सोनार (२८, रा. मूळ नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या पाचव्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी यापापूर्वी शॅक मालक आग्नेल सिल्वेरा (वय ६४) याच्यासह त्याचा मुलगा शुबर्ट सिल्वेरा (वय २३), अनिल बिस्ता (२४, मूळ नेपाळ) आणि कमल सुनार (२३, मूळ नेपाळ) यांना अटक केलीय. म्हापसा न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता त्यांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर मरीना बीच शॅकवर बोल्लारवि तेजा (वय २८, रा. आंध्रप्रदेश) याचा खून झाला. किचन बंद झाल्यानंतर खाद्यपदार्थाची मागणी केल्याने शॅक कर्मचारी व बोल्लारवि यांच्यात वाद झाला. यातून झालेल्या हाणामारीत बोल्लारवि गंभीर जखमी झाला. त्याला कांदोळी येथील रुग्णालयात दाखल केले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT