Michael Lobo, Joshua Dsouza Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गटारे बांधली, रस्ते केले म्हणजे विकास नसतो! आधी कळंगुटमधील लोकांची भीती दूर करा; जोशुआंचे मायकल लोबोंना प्रत्युत्तर

Joshua Dsouza: ढवळाढवळ करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे, असे प्रत्युत्तर आमदार जोशुआ डिसोझा यांनी मायकल लोबोंना दिले.

Sameer Panditrao

म्हापसा: कळंगुटमध्ये अलीकडे खुनाचे प्रकार, प्राणघातक हल्ले, चोऱ्यामाऱ्या वाढल्या आहेत. परिणामी लोक रात्री घराबाहेर पडण्यास घाबरतात. पूर्वीसारखे पर्यटन कळंगुटमध्ये दिसत नाही, हे मी बोलत नाही तर तेथील स्थानिक बोलत आहेत.

मायकल लोबो यांनी म्हापसा, मांद्रे व इतरत्र ढवळाढवळ करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील समस्या व प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, असे राजकीय प्रत्युत्तर उपसभापती तथा म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी मायकल लोबोंना दिले.

म्हापसा शहरातील नियोजनात शिस्तीचा अभाव आहे. अशावेळी जोशुआ डिसोझा यांना सहकार्य करण्याची आपली तयारी आहे, अशा शब्दांत कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी म्हापशात अपेक्षित विकास झालेला नाही, अशी टीका केली होती.

याला प्रत्युत्तर देताना उपसभापती जोशुआ यांनी प्रतिक्रिया दिली. मुळात आमदार म्हणून मला सहा वर्षेच झाली आहेत. तेव्हा म्हापसा मतदारसंघात मी राबविलेल्या विकास प्रकल्पांची माहिती प्रसिद्धी पत्रकातून मी येत्या दीड महिन्यांत जाहीर करीन.

तर मायकल लोबोंनी म्हापशाऐवजी स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष घालावे. केवळ गटारे बांधली किंवा रस्ते रुंदीकरण केले म्हणजेच विकास म्हणता येत नसतो. इतर गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हापशात काही विषय आहेत; परंतु लोकप्रतिनिधी या नात्याने ते प्रश्न मी सोडविण्यात समर्थ आहे, अशा शब्दांत उपसभापतींनी लोबोंचा समाचार घेतला.

मुळात मायकल लोबोंना २०१२मध्ये आमदार बनविण्यात माझ्या वडिलांनी मदत केली होती. त्याउलट लोबोंनी मला कधीच मदत केली नाही. स्वबळावर मी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलो. यापूर्वी लोबो हे माझे वडील माजी उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडून राजकीय सल्ले घ्यायचे, याची जोशुआंनी आठवण करून दिली.

फेरफटका मारा, विकास दिसेल

माझा आमदारकीचा कार्यकाळ व लोबोंच्या कारकिर्दीची तुलना होऊच शकत नाही. म्हापशात विकास झालेला नाही, असा लोबोंचा दावा असल्यास त्यांना मी म्हापसा शहराचा फेरफटका मारून आणतो. मग, लोबोंना म्हापशातील विकासकामांचा अंदाज येईल. म्हापसा शहरातील कचरा व्यवस्थापनाचा विषय आम्हाला माहिती आहे. त्यामुळे कचरा आऊटसोर्स करून, वैज्ञानिकदृष्ट्या ही समस्या मार्गी लावू. लोबोंनी आधी कळंगुटकडे लक्ष द्यावे, असा सल्ला उपसभापतींनी लोबोंना दिला.

जोशुआंवर आम्ही केलेले आरोप बरोबरच : ‘आप’

म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा काहीच काम करीत नसल्याचे आम्ही काही आठवड्यांपूर्वी सांगितले होते. आता भाजपचे आमदार मायकल लोबोही जोशुआ काहीच काम करीत नसल्याचे आरोप करीत आहेत, यावरून आम्ही केलेला आरोप खरा ठरत आहे, असे मत ‘आप’च्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.

‘आप’चे फ्रान्सिस कुएल्हो आणि सुनील सिग्नापूरकर, सलमान खान यांची उपस्थिती होते. नवे म्हापसा बसस्थानक बांधले असले तरी त्याठिकाणी चारच बसेस उभ्या असतात. जुने बसस्थानक अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

म्हापसा बाजारातील फळांची तपासणी होत नाही. ज्याठिकाणी आमदार राहतात, त्याठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक करावा, अशी मागणी केली; पण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यासह म्हापशातील विविध समस्या सोडविण्यात आमदार अपयशी ठरले असल्याचा आरोप सिग्नापूरकर यांनी केला.

भाजपचे प्रवक्ते इंडिया आघाडीवर बोलतात; पण सध्या भाजपच्या आमदारांमध्ये जो वाद सुरू झाला आहे, त्यावर का बोलत नाहीत. याशिवाय ‘मगोप’चे नेते मांद्रेची जागा ‘मगोप’ सोडणार नाही, असे सांगतात, तेव्हाही ते गप्प आहेत. केवळ विरोधकांवर टीका करण्याचे काम भाजपचे प्रवक्ते करीत आहेत, असे कुएल्हो यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT