म्हापसा: २०२१ मध्ये कळंगुट समुद्रकिनारी सिद्धी नाईक हिचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकरणाला १३ ऑगस्टला चार वर्षे उलटली. या प्रकरणी राज्य सरकारने व पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी करीत आजही सिद्धीचे आईवडिल हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
१३ ऑगस्ट २०२१ रोजी सिद्धी नाईक या १९ वर्षीय युवतीचा मृतदेह कळंगुट किनाऱ्यावर आढळल्याने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. सिद्धीला न्याय मिळावा, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. राजकीय पातळीवर तसा उठाव झाला होता.
तिला न्याय मिळावा यासाठी सिद्धीच्या कुटुंबीयांनी तसेच नातेवाईकांनी न्यायासाठी प्रचंड जोर धरला होता. त्या धर्तीवर पोलिसांकडून नंतर खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. मात्र, चार वर्षे उलटली तरी पोलिसांना या खूनाचे गूढ उकलता आलेले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हा शाखेकडे आहे. या घटनेला चार वर्षे पूर्ण होत आहेत, तरी तपास अर्पूणच आहे. पोलिसांना आजतागायत पुरावे सापडले नसल्याने तपासाची फाईल धूळ खात पडून आहे.
१.यासंदर्भात हतबल झालेल्या सिद्धीच्या आईवडिलांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मागील चार वर्षे आम्ही सिद्धीला न्याय मिळावा या आशेने लढा देत आहोत.
२.मात्र, राज्य सरकार किंवा पोलिसांनी आम्हाला न्याय मिळवून दिलेला नाही. दिवसाढवळ्या आमची मुलगी गायब होते व तिचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह दुसऱ्या दिवशी कळंगुट किनाऱ्यावर आढळतो.
३.ती किनाऱ्यावर कशी पोहचली किंवा त्यापूर्वी तिच्यासोबत नक्की काय घडले, याचा पोलिसांना सुगावा लागलेला नाही.
४.एरवी पोलिस यंत्रणा बारीक-सारीक गोष्टीचा उलगडा करते. मात्र, आमच्या मुलीला न्याय देण्यास सर्वजण कमी पडले. आमचा हा लढा जोवर सिद्धीला न्याय मिळत नाही, तोवर सुरूच राहील असे सिद्धीच्या आईवडिलांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.