Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

Rahul Gandhi video: देशात 'मत चोरी' आणि 'ईव्हीएम हॅकिंग'च्या मुद्द्यावरुन विरोधक केंद्र सरकारला सातत्याने घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
Rahul Gandhi News
Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

Rahul Gandhi video: देशात 'मत चोरी' आणि 'ईव्हीएम हॅकिंग'च्या मुद्द्यावरुन विरोधक केंद्र सरकारला सातत्याने घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलेच तापले आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करुन पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. या व्हिडिओसोबत त्यांनी एक उपरोधिक कॅप्शनही लिहिले की, "आयुष्यात खूप मजेदार अनुभव आला, पण कधी मृत लोकांशी चहा पिण्याची संधी मिळाली नव्हती. या अनोख्या अनुभवासाठी निवडणूक आयोगाचे आभार."

व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी सांगितला प्रकार

राहुल गांधींनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ते काही ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील लोकांशी बोलताना दिसत आहेत. या संवादादरम्यान ते एका व्यक्तीला विचारतात, "तुम्ही आता जिवंतच नाही, असे ऐकले आहे. तुम्हाला हे कसे कळले?" यावर ती व्यक्ती उत्तर देते, "आम्ही जिवंत असूनही लोकांनी आम्हाला मृत घोषित केले. मतदार यादी तपासल्यानंतर आम्हाला हे कळले."

यावर राहुल गांधी म्हणतात की, "याचा अर्थ निवडणूक आयोगाने तुम्हाला मारले." त्यानंतर राहुल गांधी विचारतात, "तुमच्यासारखे किती लोक आहेत आणि तुम्ही किती मतदान केंद्रांमधील आहात?" या प्रश्नावर ती व्यक्ती सांगते, "एका पंचायतीमध्ये किमान 50 लोक असे असतील. सध्या आम्ही 3 ते 4 पोलिंग बूथमधील आहोत. अनेक लोक अजून येथे पोहोचू शकले नाहीत." ही घटना तेजस्वी यादव यांच्या राघोपूर विधानसभा मतदारसंघातील असल्याचेही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले.

Rahul Gandhi News
Rahul Gandhi: 'व्हिडिओ प्रूफ' ते 'नरेंद्र..सरेंडर'!! सुरक्षा दलांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह का? राहुल गांधींच्या भूमिकेवर तीव्र टीका
Rahul Gandhi News
Rahul Gandhi: 'आपण भाजप, RSS आणि भारतीय राज्याशी लढतोय'; राहुल गांधींच्या वक्तव्याने नवा वाद होणार?

65 लाख मतदारांच्या नावांवर प्रश्नचिन्ह

व्हिडिओमध्ये एक महिला सांगते की, "बिहारमधील 65 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून का वगळली गेली, याची माहिती द्यावी, या मागणीसाठी ही महिला आज सुप्रीम कोर्टात सहा तास उभी होती." तसेच, 'शिफ्ट' झालेल्या 36 लाख लोकांबद्दलही माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

यावर राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधत म्हटले की, "निवडणूक आयोग हा डेटा देऊ इच्छित नाही. कारण त्यांनी हा डेटा दिल्यास त्यांचा संपूर्ण गेम (खेळ) संपून जाईल." राहुल गांधींच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. विरोधक गेली अनेक वर्षे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मतदार यादीतील घोळ, मृत लोकांची नावे जिवंत दाखवणे आणि जिवंत लोकांना मृत घोषित करणे यांसारख्या गंभीर मुद्द्यांमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या व्हिडिओमुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com