Goa Crime: डॉक्टर निघाला ठग! 1.41 लाखांचे दागिने लंपास; 9 गुन्हे दाखल झालेला ऑर्थोपेडिक सर्जन अडकला

Goa Doctor Fraud case: बनावट RTGS पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवून सोन्याचे दागिने खरेदी करून फसवणूक करणाऱ्या एका ऑर्थोपेडिक सर्जनला पणजी पोलिसांनी अटक
Doctor Attested In Goa
Doctor Attested Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बनावट RTGS पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवून सोन्याचे दागिने खरेदी करून फसवणूक करणाऱ्या एका ऑर्थोपेडिक सर्जनला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने तब्बल १,४१,१५७ रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याचे समोर आले असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अशी केली फसवणूक

११ ऑगस्ट २०२५ रोजी पणजी मार्केटमधील कामत सेंटर येथील 'ऑरम ज्वेल्स' या दुकानातून मीरजा शेराज अलीबैग या आरोपीने विविध प्रकारचे सोन्याचे दागिने खरेदी केले. यामध्ये २.७५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, ७.७ ग्रॅम वजनाचे लहान मंगळसूत्र, ०.८५ ग्रॅम वजनाचे गणपतीचे लॉकेट आणि इतर काही दागिने होते. खरेदीनंतर, त्याने १,४१,१५७ रुपयांचे पेमेंट RTGS द्वारे केल्याचा एक बनावट स्क्रीनशॉट दुकानमालक तेजस साळकर यांना दाखवला. पेमेंट झाले असे भासवून त्याने हे दागिने ताब्यात घेतले आणि दुकानमालकाची फसवणूक केली.

आरोपीला अटक, दागिने हस्तगत

या फसवणुकीची तक्रार मिळताच पणजी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे हैदराबाद, तेलंगणा येथील मीरजा शेराज अलीबैग (वय ३८) याला १२ ऑगस्ट २०२५ रोजी अटक केली. विशेष म्हणजे, आरोपी हा व्यवसायाने ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून फसवणूक केलेले सर्व सोन्याचे दागिने (अंदाजे १,४१,१५७ रुपये किमतीचे) जप्त केले आहेत.

विविध राज्यांमध्ये ९ गुन्हे दाखल

पोलिसांच्या तपासात आरोपी मीरजा शेराज अलीबैग याच्यावर अशाच प्रकारच्या फसवणुकीचे देशातील विविध राज्यांमध्ये ९ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून (क्राइम नंबर १०९/२०२५) पुढील तपास सुरू केला आहे.

पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने, उपनिरीक्षक शाहीन शेट्ये, कॉन्स्टेबल मिनेश नाईक, सुरेश नाईक, इरमिया गुरैया, चालक विकास नाईक यांच्यासह ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. एसडीपीओ सुदेश आर. नाईक आणि एसपी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com