WI vs PAK: 18 धावांत 6 विकेट्स...! पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या 'या' पठ्ठ्यानं उडवला फज्जा; डेल स्टेनचा मोडला 13 वर्ष जुना रेकॉर्ड

Jayden Seales Record: वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जयडन सील्स याने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी करत 6 बळी घेतले.
Jayden Seales Record
Jayden SealesDainik Gomantak
Published on
Updated on

Jayden Seales Record: वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जयडन सील्स याने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी करत 6 बळी घेतले. त्याने 7.2 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 18 धावा देऊन हा पराक्रम केला. शानदार गोलंदाजीच्या जोरावर सील्सने दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज डेल स्टेनचा 13 वर्षांपूर्वीचा पाकिस्तानविरुद्धचा सर्वोत्तम गोलंदाजीचा रेकॉर्ड मोडला.

यापूर्वी, पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) वनडेमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा रेकॉर्ड 2012 मध्ये डेल स्टेनच्या नावावर होता. स्टेनने गकेबरहा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात 39 धावांत 6 गडी बाद केले होते. या दोघांव्यतिरिक्त, श्रीलंकेचा थिसारा परेरा हा पाकिस्तानविरुद्ध वनडेमध्ये एकाच डावात सहा बळी घेणारा तिसरा गोलंदाज आहे. परेराने ही कामगिरी 2012 मध्ये केली होती.

वेस्ट इंडिजसाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

दरम्यान, 18 धावांत 6 बळी घेण्याची जयडन सील्सची कामगिरी वेस्ट इंडिजच्या कोणत्याही गोलंदाजासाठी तिसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. वेस्ट इंडिजसाठी (West Indies) वनडेमध्ये सर्वोत्तम स्पेल टाकण्याचा रेकॉर्ड विन्स्टन डेव्हिसच्या नावावर आहे. त्याने 1983 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 51 धावांत 7 गडी बाद केले होते. त्यानंतर, कॉलिन क्रॉफ्टने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 15 धावांत 6 गडी बाद केले होते. सील्सची ही कामगिरी गेल्या 42 वर्षांत वेस्ट इंडिजच्या कोणत्याही गोलंदाजाची सर्वात उत्कृष्ट कामगिरी आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत 10 बळी घेतल्याबद्दल त्याला प्लेअर ऑफ द सीरीज पुरस्काराने गौरवण्यात आले.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 294 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होपने दमदार शतक ठोकले. त्याने 94 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 120 धावांची शानदार खेळी खेळली होती. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 92 धावांतच ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून सलमान अली आगाने सर्वाधिक 30 धावा (49 चेंडू) केल्या, तर मोहम्मद नवाजने 23 धावा (28 चेंडू) केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com