
पणजी: पणजी पोलिसांनी हैदराबाद येथील मिर्झा शेराझ अलीबाईग (३८) याला पणजीतील स्थानिक ज्वेलर्सला फसवून रु.१,४१,१५७ चे सोन्याचे दागिने हडप केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.
संशयिताकडून सर्व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. तपासात संशयितावर देशातील इतर राज्यांमध्ये अशाच स्वरूपाचे नऊ गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तेजस साळकर (मालक, ऑरम ज्वेल्स, पणजी) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ११ ऑगस्ट रोजी अलीबाईगने त्यांच्या दुकानातून एक सोन्याची चेन, एक लहान मंगळसूत्र, तसेच अनेक सोन्याचे लॉकेट्स व कानातले खरेदी केली.
त्यावेळी आरोपीने रु.१,४१,१५७च्या आरटीजीएस व्यवहाराचा बोगस स्क्रीनशॉट दाखवून पैसे भरल्याचे भासविले. त्यावर ज्वेलर्सने दागिने त्याला दिले. मात्र, प्रत्यक्षात कोणताही आर्थिक व्यवहार न झाल्याचे दिसताच तक्रार दाखल केली. तक्रार नोंद होताच, पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या पथकाने संशयितास १२ रोजी अटक केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.