Cacora Municipal Council : काकोडा कुडचडे पालिकेच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या दुकानांना व दोन थिएटर्स अठरा लाख रुपये प्रतिमहिना याप्रमाणे तसेच बहुचर्चित फूडकोर्ट साठी दोन बोलीदार लाभले आहेत. आता यावर अंतिम निर्णय पालिका मंडळाच्या बैठकीत होणार असल्याचे मुख्याधिकारी मनोहर कारेकर यांनी सांगितले.
कुडचडे पालिकेच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या दुकानांना व थिएटर्सना योग्य तो बोलीदार न लाभल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून दुकाने व थिएटर्स सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पालिकेला लाखोंच्या महसूलापासून वंचित राहावे लागले आहे. या इमारतीत दोन थिएटर्स असून ती सुरू करण्यासाठी पालिकेची धडपड सुरू आहे पण थिएटर्स चालू करण्यासाठी त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार असल्याने सदर थिएटर्स सुरू होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे.याठिकाणी जी दुकाने आहेत ती सुद्धा बंदच असल्याने आता यावेळी तरी ती सुरू होणार का हे पालिका मंडळावर अवलंबून आहे.
प्रशासकीय इमारतीप्रमाणे बहुचर्चित फूडकोर्ट साठी दोन बोलीदार लाभले असून फूडकोर्ट मध्ये असलेल्या एकूण 33 गाळ्यांना प्रत्येकी पाच हजार प्रतिमाहिना भाडे ठरवले असून यावर आता अंतिम निर्णय पालिका मंडळाच्या बैठकीत होणार आहे. यापूर्वी दोन वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. पण बोलीदार मिळाला नव्हता. आता तिसऱ्यांदा निविदा काढली असून दोन बोलीदार मिळाले असल्याचे कारेकर यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पालिकेच्या इमारतीत गळती लागलेली आहे. गळतीमुळे कामासाठी येणाऱ्या लोकांना नाहक त्रास सोसावा लागतो. 20 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या इमारतीला गळती कशी काय लागते,अशी विचारणा होत आहे.
काम झाल्याशिवाय बिल नाही !
कुडचडे-काकोडा पालिकेच्या प्रशासकीय इमारतीत सध्या पावसाचे पाणी झिरपत असल्याने आपली कामे घेऊन येणाऱ्या लोकांना बराच त्रास होतो व याविषयी आम्ही सदर कंत्राटदाराशी बोलणी करून त्यांना यावर उपाय काढावा, असे सांगितले आहे. सदर इमारत ‘जीसुडा’तर्फे बांधण्यात आली होती, असे मुख्याधिकारी कारेकर यांनी सांगितले. जोपर्यंत इमारतीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कंत्राटदाराला त्याचे बिल दिले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.