Aleixo Sequeira Dainik Gomantak
गोवा

बांधकाम खाते मुख्यमंत्र्यांकडे राहणार, सिक्वेरांना कोणते खाते? समोर आली महत्वाची अपडेट

काब्राल यांचा राजीनामा घेतल्यानंतर रविवारी आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Pramod Yadav

Aleixo Sequeira: काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठ बंडखोर आमदारांपैकी एकाला मंत्रिपद देण्याचे आश्वासन सत्ताधारी पक्षाने पूर्ण केले आहे. काब्राल यांचा राजीनामा घेतल्यानंतर रविवारी आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

सिक्वेरा यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होती. दरम्यान, याबाबत आता माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, निलेश काब्राल यांच्याकडे असलेले सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वत:कडे ठेवणार आहेत.

तर, नव्याने शपथ घेतलेले मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना पर्यावरण, बंदर कप्तान, कायदा आणि संसदीय कामकाज ही खाती मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकर भरतीत सुमारे १४० कोटींचा घोटाळा झाला असून याची चौकशी सीबीआय किंवा ‘ईडी’द्वारे करण्यात यावी, अशी मागणी ‘आरजी’चे आदित्य देसाई यांनी केली होती.

दरम्यान, काब्राल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी सिक्वेरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांना कोणते खाते मिळणार हे गुलदस्त्यात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT