Sarbananda Sonowal|Mormugao Port professional associations|Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port: 'खासगीकरणामुळे अनेक समस्या'; मुरगाव शिष्टमंडळाचे केंद्रीयमंत्री सोनोवाल यांना निवेदन

गोमन्तक डिजिटल टीम

Mormugao Port Privatization Issue

वास्को: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली मुरगाव बंदरातील विविध व्यावसायिकांच्या संघटनांच्या शिष्टमंडळाने बंदर, जहाजबांधणी व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांची भेट घेऊन मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक दहा व अकराचे खासगीकरण करण्यास विरोध करणारे निवेदन दिले. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

द मार्मुगाव स्टिव्हडोर्स असोसिएशन, श्री गणेश मार्मुगोवा टिप्पर ट्रक ओनर असोसिएशन व मुरगाव बंदरातील इतर व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींनी निवेदने दिली आहेत. मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक दहा व अकरावरून मोठ्या प्रमाणात कार्गो हाताळणी होते. जेणेकरून मुरगाव बंदर प्राधिकरणाला मोठा महसूल मिळतो.

भविष्यात या दोन्ही धक्क्याद्वारे प्राधिकरणाला अधिकाधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे. मात्र, हे दोन्ही धक्के प्राधिकरणाने एका खासगी कंपनीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या हेतू व रणनीतीबद्दल अनेक शंका निर्माण होत आहेत. यामुळे नोकऱ्या व उपजीविकांचे नुकसान होण्याची भीती आहे.

कार्गो हाताळणी कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये उपकरणे खरेदी करण्यासाठी, कार्गो हाताळणीसाठी मनुष्यबळ प्रशिक्षण, स्थलांतरित कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या दोन्ही धक्क्यांचे खासगीकरण करण्यात आले, तर स्टिव्हडोरवर मोठा परिणाम होईल, कामच बंद झाल्याने बेरोजगारी होईल. हे काम बंद झाल्यावर सुमारे १५०० कामगार व त्यांच्या कुटुंबावर परिणाम होईल. इतर समस्यांही या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

यावेळी श्री गणेश मार्मुगोवा टिप्पर ट्रक ओनर असोसिएशननेही समस्यांचे निवेदन दिले आहे. आम्ही सहा चाकी टिप्पर ट्रकची सेवा गेल्या १० वर्षांहून अधिक काळ मुरगाव बंदरात देत आहोत. सातत्यपूर्ण व वक्तशीरपणा म्हणून आमची ओळख आहे. आम्ही रोटेशन पद्धतीने संबंधितांना सेवा देऊन कार्गो हाताळणी करतो. या व्यवसायावर १०० हून अधिक कुटुंबे गेल्या काही वर्षांपासून अवलंबून आहेत. आमचे जीवनमान या सहा चाकी टिप्पर ट्रकांवर अवलंबून आहे, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दहाचाकी डंपर ट्रक वापरण्याची परवानगी रद्द करा

खासगीकरणामुळे काही समस्या निर्माण होतील. भविष्यात अधिक चाकांचे टिप्पर ट्रक तैनात केल्यास आमच्या व्यवसायावर व स्थानिकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होईल. त्यासाठी मालवाहतुकीसाठी दहाचाकी डंपर ट्रक वापरण्याची परवानगी रद्द करणे. तसेच इतर गोष्टीसाठी तुमच्या हस्तक्षेपांची गरज असल्याचे श्री गणेश मार्मुगोवा टिप्पर ट्रक ओनर असोसिएशनने केंद्रीय जहाजबांधणी व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT