Pipeline Burst Dainik Gomantak
गोवा

Pipeline Burst : भाटलेतील ‘ती’ जलवाहिनी 24 तासांच्या आत दुरुस्त

पाणीपुरवठा सुरळीत; भविष्यात खोदकाम करताना काळजी घेण्याची सूचना

गोमन्तक डिजिटल टीम

Pipeline Burst : भाटले येथे फुटलेली जलवाहिनी अखेर दुरुस्त करण्यात आली आहे. रात्री उशिरा किंवा शुक्रवारी सकाळपर्यंत ताळगाव, सांताक्रूझ, सांतआंद्रे भागांत पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती साबांखातील जल विभागाचे कार्यकारी अभियंता निवृत्ती पार्सेकर यांनी दिली.

बुधवारी सायंकाळी सांडपाणी वाहिनी घालताना कंत्राटदाराकडून जलवाहिनी फुटली होती. दरम्यान, जलवाहिनीचे काम सुरू असताना सांताक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी घटनास्थळी जाऊन कामाचा आढावा घेतला.

युद्धपातळीवर काम

गुरुवार सायंकाळपासून युद्धपातळीवर काम करून जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली. नवीन जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण झाले असून आता त्यावर काँक्रीट ओतण्यात येणार आहे. काँक्रीट सुकून घट्ट होण्यास किमान चार तास जाणार आहेत. त्यानंतर पाणी पुरवठा सुरू केला जाईल, असे पार्सेकर यांनी सांगितले.

बऱ्याच दिवसांपासून या परिसरात सांडपाणी वाहिनी घालण्यासाठी खोदकाम सुरू आहे. त्यात बुधवारी सायंकाळी 5.30 वा. ते 6 वा. सुमारास 600 एमएमची पीआय जलवाहिनी फुटल्याने पाणी परिसरात शिरले. काही घरांतही पाणी घुसले होते. नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. त्यात सायंकाळची वेळ असल्याने वाहतूकदारांना देखील याचा त्रास झाला.

फर्निचरही पाण्यात

जलवाहिनी फुटल्याने घरात अचानक पाणी शिरल्याने तिवरे यांच्या कुटुंबांची मोठी धावपळ उडाली. घरातील पाणी बाहेर काढताना त्यांना नाकीनऊ झाले होते. पाण्यात फर्निचर, चार्जर्स, लॅपटॉप व इतर साहित्य बुडाल्याने त्यांचे नुकसानही झाले.

कंत्राटदाराला भुर्दंड

आज गुरुवारी नवीन जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ताळगाव आणि सांतआंद्रेतील भागांमध्ये पाणी पुरवठा पूर्ववत होणार आहे. जलवाहिनी फोडल्याबद्दल कंत्राटदाराकडून खर्च वसूल करून घ्यायचा की नाही ही प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती जल विभागाचे कार्यकारी अभियंता निवृत्ती पार्सेकर यांनी दिली.

परिसरात चिंता

अचानक जलवाहिनी फुटल्याने पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पाण्याचा साठा नाही, अशा नागरिकांकडून मात्र चिंता व्यक्त झाली. उद्या पाणी मिळणार नाही, अशी बातमी पसरताचा काही नागरिकांनी धावपळ सुरु केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT