IndiGo Flights Update: ‘इंडिगो’ची गोव्यातून 10 विमाने रद्द! सेवा हळहळू रुळावर; प्राधिकरणाने छायाचित्रे केली Viral

Indigo flight Goa: केंद्र सरकारने कडक भूमिका घेतल्याने ‘इंडिगो’ची सेवा हळहळू रुळावर येऊ लागली आहे. गोव्यातून इतर ठिकाणी जाणाऱ्या ४१ पैकी ३१ उड्डाणे झाली.
IndiGo Crisis
IndiGo CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्र सरकारने कडक भूमिका घेतल्याने ‘इंडिगो’ची सेवा हळहळू रुळावर येऊ लागली आहे. गोव्यातून इतर ठिकाणी जाणाऱ्या ४१ पैकी ३१ उड्डाणे झाली, तर दहा उड्डाणे रद्द झाल्याची माहिती गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने आपल्या ‘एक्स'' हँडलवरून दिली आहे.

गेली सहा दिवसांपासून सुरू झालेला ‘विमान रद्द’चा प्रकार काही अंशी थांबल्याने विमानतळावरील बैठक व्यवस्था व काऊंटरवर प्रवाशांची फारशी गर्दी दिसली नाही. प्राधिकरणाने याचीही छायाचित्रे ‘एक्स’ हँडलवरून व्हायरल करत माहिती सार्वजनिक केली आहे.

IndiGo Crisis
Indigo Flights Cancelled: इंडिगोची पुन्हा 14 उड्डाणे रद्द! दाबोळीवर प्रवाशांचे हाल; पर्यटन हंगामावरही परिणाम

त्याशिवाय ‘इंडिगो’च्या कोणत्या दहा फेऱ्या रद्द झाल्या, त्याची यादीही समाजमाध्यमातून दिली आहे. केंद्र सरकारने कंपन्यांना प्रवाशांचे साहित्य शोधून काढण्याबरोबर तिकिटाचे पैसे परत करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत. शनिवारी ८०० च्यावर विमाने रद्द झाली. इंडिगोच्या वतीने आता १३८ पैकी १३५ ठिकाणांवर सेवा सुरू होईल, असा दावा केला गेला आहे.

IndiGo Crisis
IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

याशिवाय केंद्र सरकारने इंडिगोच्या सीईओला कारण दाखवा नोटीस शनिवारीच बजावली असून, २४ तासांत या झालेल्या गोंधळाविषयी स्पष्टीकरण मागितले आहे. याशिवाय तिकिटांची दरवाढ न करण्याच्या स्पष्ट सूचना सरकारने सर्व विमान कंपन्यांना दिल्या आहेत. तसेच ५ ते १५ डिसेंबर दरम्यान विमानसेवेचे बुकिंग केलेल्यांना सर्व रक्कम परत केली जाईल, असे कंपनीने जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com