Karapur: '..हा अपघात नसून, खुनाचाच प्रकार'! शेकडो नागरिकांची पोलीस स्थानकावर धडक; मशाल मोर्चातून चौकशीची मागणी Video

Karapur Woman Death: वासंतीचा मृत्यू हा अपघात नसून, तो खुनाचाच प्रकार आहे. यामागे भू-माफियांचा हात आहे, असा पुनरुच्चार नातलगांसह कार्यकर्त्यांनी करून प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करा, अशी मागणी केली.
Karapur Woman Death
Karapur Woman DeathDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: कारापूर येथील वासंती रामा सालेलकर या अविवाहित महिलेच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी विरोधात कडक कारवाई करा. मृत वासंती हिच्या कुटुंबाला न्याय द्या, अशी मागणी करीत सामाजिक कार्यकर्त्यांनी भव्य ‘मूक मशाल मोर्चा’ काढून डिचोलीच्या पोलिस स्थानकावर धडक दिली.

वासंतीचा मृत्यू हा अपघात नसून, तो खुनाचाच प्रकार आहे. यामागे भू-माफियांचा हात आहे, असा पुनरुच्चार नातलगांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी करून प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करा, अशी मागणी केली.

Karapur Woman Death
Karapur Death: बहीण बाहेरून आली, घरात आढळला मृतदेह; कारापूरातील घटनेचे वाढले गूढ; 'त्या' महिलेवर आधीही हल्ला झाल्याची माहिती समोर

सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनानुसार (रविवारी) सायंकाळी कारापूर येथून मृत वासंती राहत होती त्या वादग्रस्त मालमत्तेपासून काढलेल्या या ‘मूक मशाल मोर्चा’त तीनशेपेक्षा अधिक लोकांचा सहभाग होता.

Karapur Woman Death
Karapur: ..हा अपघाती मृत्यू नाही, घातपाताचा प्रकार! कारापूर प्रकरणी निघणार 'मशाल मोर्चा'; काय आहे प्रकरण Watch Video

राजकीय दबावाचा बळी

वासंतीने मेमध्ये पोलिसांत तक्रार केली होती. न्यायासाठी तिने पणजीत उपोषणही केले होते. मात्र, उपोषण वा तक्रारीवर चौकशी झाली नाही. राजकीय दबावामुळे तिला न्याय मिळाला नाही, असा आरोप ‘गाकुवे’चे उपाध्यक्ष रामकृष्ण जल्मी,ॲड. अजय प्रभूगावकर, स्वप्नेश शेर्लेकर, अध्यक्ष प्रतीक्षा खलप, फिदोल परेरा आदींंनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com