Jennifer Monserrat Dainik Gomantak
गोवा

Dona Paula News : दोना पावला परिसरात चोऱ्या वाढल्या : जेनिफर मोन्सेरात

Dona Paula News : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करू, असे नमूद केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, दोनापावल येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे तेथील रहिवासी भयभीत झाल्याचे ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी आज विधानसभेत शून्य तासाला नमूद केले. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करू, असे नमूद केले.

सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले, सेंट ॲनाचे फेस्त हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. तवशांचे फेस्त म्हणून प्रसिद्ध असलेल्‍या फेस्ताचा विसर पडला होता. २८ जुलै रोजी तळावली गावाने सेंट ॲनाचा उत्सव साजरा केला. स्व. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले होते की, सेंट ॲना फेस्त हे राज्य महोत्सव घोषित केले जाईल.

तथापि, आजपर्यंत अधिकृतपणे गोवा राजपत्रात याचा समावेश केलेला नाही. गेल्या वर्षी सेंट ॲना चर्चजवळ एक संरक्षक भिंत आणि उताराचा भाग कोसळला होता, त्यामुळे अनेक लोक प्रभावित झाले होते. एक वर्ष उलटून गेले आणि रस्ता अजूनही नादुरुस्त आहे. सरकारने दुरुस्ती केलेली नाही.

रहिवाशांमध्ये भीती

मोन्सेरात म्हणाल्या, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे दोनापावल येथील रहिवाशांची घाबरगुंडी उडाली आहे. शेवटची चोरी ही २२ जुलै रोजी झाली होती, जिथे चोरट्यांनी मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या.

४ महिन्यांतील ही तिसरी घटना असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यात ढगाळ वातावरण! पावसाची शक्यता की उकाडा वाढणार? कसा असणार आठवडा? जाणून घ्या..

Rashi Bhavishya: नवीन व्यवसायासाठी योग्य वेळ! प्रगतीची दारे उघडणार; 'या' राशींची कामे होणार पूर्ण

Dance Viral Video: जिममध्ये साडीचा स्वॅग! काळ्या साडीत ट्रेडमिलवर तरुणीने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'विषय हार्ड!'

illegal LED fishing: वास्कोत बेकायदेशीर 'एलईडी' मासेमारीचा पर्दाफाश; मत्स्यव्यवसाय विभागाकडून तीन बोटी जप्त

Dhuler: सफर गोव्याची! म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचे, मातीचे ओढ लावणारे 'धुळेर'

SCROLL FOR NEXT