G -20 परीषदेत RRR चा डंका...ब्राझीलच्या अध्यक्षांनी केलं चित्रपटाचं कौतुक

सध्या दिल्ली इथं सुरू असलेल्या G 20 परीषदेत ब्राझीलच्या अध्यक्षांनी RRR चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
G - 20
G - 20Dainik Gomantak
Published on
Updated on

साऊथचे स्टार दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा परदेशात डंका वाजवणारा RRR कोण विसरेल? या चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली.

चित्रपटाने संगीताचा ऑस्कर मिळवलाही. चित्रपटातल्या नाटू नाटू गाण्याने भारतासह जगाला वेड लावले.

सध्या दिल्ली इथं सुरु असलेल्या G-20 परीषदेत ब्राझीलच्या अध्यक्षांनी RRR चं कौतुक केलं आहे.

ब्राझीलच्या अध्यक्षांनी केलं कौतुक

रामचरण आणि ज्यूनिअर NTR ने RRR मध्ये केलेला परफॉर्मन्स सर्वांच्या कौतुकाचा विषय झाला होता. चित्रपटातला अभिनय आणि संगीताने चाहत्यांनाच नव्हे तर मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही वेड लावलं होतं.

ब्राझीलचे अध्यक्ष, लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा सध्या G20 शिखर परिषदेसाठी भारतात आहेत, म्हणाले की ते SS राजामौली यांच्या RRR ने मंत्रमुग्ध झाले आहेत.

ब्राझीलचे अध्यक्ष म्हणतात

प्रसारमाध्यमांशी बोलताना ब्राझीलचे अध्यक्ष म्हणाले, "आरआरआर हा तीन तासांचा चित्रपट आहे आणि चित्रपटात सुंदर नृत्यासह खरोखर मजेदार दृश्ये आहेत. भारत आणि भारतीयांवर ब्रिटिशांनी ठेवलेल्या नियंत्रणावर यात खूप टीका आहे.

सर्वांना चित्रपट पाहण्यासाठी सांगतो

हा चित्रपट जगभर ब्लॉकबस्टर असायला हवा होता कारण माझ्याशी बोलणाऱ्या प्रत्येकाला, मी पहिल्यांदा म्हणतो, तुम्ही तीन तासांचा बंडखोरी दाखवणारा आणि क्रांती करु पाहणारा चित्रपट पाहिला आहे का? आणि म्हणूनच मी चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि कलाकारांचे अभिनंदन करतो. कारण त्याने मला मंत्रमुग्ध केले.

एसएस राजामौलींनी मानले आभार

RRR चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी स्तुतीवर प्रतिक्रिया दिली आणि RRR बद्दल केलेल्या कौतुकाबद्दल लुला दा सिल्वा यांचे आभार मानले. राजामौलींनी ट्विटरवर लिहिले, “सर… @LulaOficial तुमच्या दयाळू शब्दांबद्दल तुमचे खूप खूप आभार. 

तुम्ही भारतीय सिनेमाचा उल्लेख केला आणि RRR चा आनंद घेतला हे जाणून खूप आनंद झाला!! आमची टीम उत्साही आहे. आशा आहे की तुम्ही आमच्या देशात चांगला वेळ घालवत असाल.”

G - 20
100 वर्षांनंतर जेव्हा लोक गदर, कश्मिर फाईल्स पाहतील तेव्हा...नसीरुद्दीन शाह स्पष्टच बोलले

RRR ची गोष्ट काय आहे?

RRR हा क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनाचे काल्पनिक वर्णन आहे. या महान योद्धांची भूमिका राम चरण आणि जूनियर NTR यांनी केली आहे. 

या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण, श्रिया सरन, रे स्टीव्हनसन, अ‍ॅलिसन डूडी आणि ऑलिव्हिया मॉरिस सहाय्यक भूमिकेत आहेत. चित्रपटाने जगभरात आपल्या यशाचा डंका वाजवला आहे.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com