Chicalim Theft Dainik Gomantak
गोवा

Chicalim Theft: गोव्यात 'एनआरआय'च्या बंगल्यात घरफोडी; 500 पाऊंड्ससह 25 हजाराची रोकड लंपास

दोन चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्हीत कैद

Akshay Nirmale

Chicalim Theft: गोव्यातील चिखली येथे एक घरफोडी झाली आहे. एनआरआय व्यक्तीच्या घरात ही घरफोडी झाली आहे. यात 500 पाऊंड्ससह 25 हजार रूपयांची रोकड चोरांनी लंपास केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष सिक्वेरा यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.

ज्या बंगल्यात चोरी झाली आहे तो आशिष यांचा भाऊ जोसेफ सिक्वेरा यांचा आहे. आशिष हे नुवे येथे राहतात. तर जोसेफ यांचा बंगला चिखली येथे आहे.

जोसेफ एनआरआय आहे. तो एप्रिलमध्ये गोव्यात आला होता. 28 एप्रिलपासून जोसेफ सिक्वेरा परत गेला, त्यामुळे तेव्हापासून बंगला बंद होता. बंगल्याचे ग्रिल तोडून अज्ञातांनी बंगल्यात प्रवेश केला आणि येथील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या.

आशिष यांना ही माहिती कळल्यावर त्यांनी जोसेफ यांना फोनवरून ही माहिती दिली. तसेच घरात जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांची 500 पाऊंड्सची ज्वेलरी आणि सुमारे 25 हजार रूपयांची रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. दोन चोरट्यांनी ही चोरी केली असून ते दोघेही सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असून त्यानुसार तपास केला जात आहे. या चोरट्यांच्या शोधासाठी पथक नेमले आहे.

लवकरच या चोरट्यांना गजाआड करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पाळत ठेऊन ही चोरी केल्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT