Parking
Parking  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: म्हापसा सरकारी संकुलात पार्किंगचा बोजवारा

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News म्हापसा येथील सरकारी संकुलाच्या आवारात पार्किंगचा व वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अधिकारी वर्गाकडून काही पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारी संकुलात येणारे अनेकजण जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने लावली जातात. परिणामी, वाहन बाहेर काढतेवेळी अधिकाऱ्यांसह इतरांना देखील कसरत करावी लागते आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बार्देश तालुक्यातील म्हापसा शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मरड येथे ही सरकारी संकुल इमारत आहे. येथे उपजिल्हाधिकारी, मामलेदार, टीसीपी, महसूल, बीडीओ, नागरी पुरवठा आदींची कार्यालये आहेत.

त्यामुळे कामासाठी लोकांची सकाळी ते सायंकाळपर्यंत बरीच वर्दळ असते. मात्र, पार्किंगच्या अपुऱ्या जागेअभावी अनेकजण बेशिस्त वाहने पार्क करतात. काहीजण चारचाकी मागे दुचाकी पार्क करतात. त्यामुळे वाहने काढण्यास त्रास होतो.

सर्व कर्मचाऱ्यांना देणार पास

उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध माहितीनुसार, सरकारी संकुलात पार्किंग व वाहतूक कोंडीचा बोजवारा उडत आहे. त्यामुळेच सरकारी संकुलातील सर्व कर्मचाऱ्यांना पार्किंग पास दिले जातील.

तर संकुलात कामानिमित्त येणारे वकील व इतर अभ्यागतांनी आपण कुठल्या कार्यालयात कामानिमित्त आलोय, हे सांगून आतमध्ये प्रवेश करावा.

पार्किंगच्या जागा चिन्हांकित

सध्या प्राथमिक स्तरावर आम्ही निरीक्षण करताहोत की संकुलात पार्किंगसाठी नेमकी किती जागा लागते. सध्या पार्किंगच्या जागा चिन्हांकित केल्या जात आहेत. त्याशिवाय इथे सुपर मार्केट आहे.

त्यांची वाहने संकुलाच्या आवारात असतात. त्यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

बाजारहाटसाठी येणाऱ्यांचा बेशिस्तपणा

1. अवैध पार्किंगची दखल घेत उपजिल्हाधिकारी कार्यालयाने सरकारी संकुलातील आवारात पार्किंगमध्ये शिस्त आणण्याचे ठरविले आहे.

आवारात पार्किंगची जागा चिन्हांकित करुन सोमवारपासून तिथेच वाहनधारकांना गाड्या लावण्यास सांगितले जाईल.

2. त्याशिवाय संकुलात येणाऱ्यांचे कुठल्या कार्यालयात काम आहे की नाही, याची शहानिशा केली जाईल.

जेणेकरुन बाजारहाटसाठी येणारे काहीजण विनाकारण वाहने संकुलाच्या आवारात लावून तासन्‌तास जागा अडवतात. परिणामी इतरांची गैरसोय होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT