Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: 'बर्च अग्निकांड' प्रकरण; 'त्या' तिघांच्या जामिनावर 18 रोजी निकाल, आव्हान याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण

Goa Nightclub Fire Case: ६ डिसेंबर २०२५ रोजी क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाइट क्लबमधील भीषण अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी, क्लबचे मालक अजय गुप्ता, गौरव लुथरा व सौरभ लुथरा यांच्या जामीन मंजुरीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाले असून, मंगळवारी, १८ ऑगस्ट रोजी न्यायालय निकाल जाहीर करणार आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपींना मिळालेल्या जामिनाविरोधात गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली होती. ६ डिसेंबर २०२५ रोजी क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर क्लबच्या संचालनासाठी आवश्यक परवानग्या नसल्याने पोलिसांनी सौरभ व गौरव लुथरा तसेच क्लबमधील भागीदार अजय गुप्ता यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या तपासादरम्यान क्लबच्या परवान्यांशी संबंधित कागदपत्रांबाबतही स्वतंत्र तपास सुरू झाला. यामध्ये आरोग्य विभागाच्या कथित बनावट ‘ना हरकत प्रमाणपत्रा’चा वापर करून उत्पादन शुल्क विभागाची परवानगी मिळवल्याचे तपासात समोर आल्याने म्हापसा पोलिसांनी तिघांवरही आणखी एक गुन्हा नोंदविला.

दोन्ही प्रकरणांत म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एप्रिलमध्ये सौरभ व गौरव लुथरा यांना सशर्त जामीन मंजूर केला. अजय गुप्तालाही यापूर्वी जामीन मिळाला होता. त्यानंतर राज्य सरकारने तिघांना मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या.

मे महिन्यात उच्च न्यायालयाने सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांना राज्य सरकारच्या जामीन रद्द करण्याच्या याचिकांवर नोटिसा बजावून त्यांची बाजू ऐकून घेतली. युक्तिवाद संपल्यानंतर उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT