Bicholim Flower Market Dainik Gomantak
गोवा

Dussehra 2025:...दसऱ्याला झेंडू होणार स्वस्त! डिचोलीत कर्नाटकमधून फुलांची ‘बंपर’ आवक

Bicholim Flower Market: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या कर्नाटकमधून झेंडू फुलांची डिचोलीत ''बंपर''आवक झाली असून, यंदा दसऱ्याला ही फुले स्वस्त होण्याची आशा आहे.

Sameer Panditrao

डिचोली: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या कर्नाटकमधून झेंडू फुलांची डिचोलीत ''बंपर''आवक झाली असून, यंदा दसऱ्याला ही फुले स्वस्त होण्याची आशा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत झेंडू फुले निश्चितच स्वस्त होणार आहेत.

तसे संकेतही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. दुसऱ्या बाजूने स्थानिक भागातील मळ्यात फुलणारी झेंडूची फुले अद्याप बाजारात आलेली नाहीत. यंदा स्थानिक झेंडूचे मळे अपेक्षेप्रमाणे बहरलेले नाहीत. त्यामुळे यंदा स्थानिक झेंडू फुलांचा बाजारात तुटवडा निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे.

दसऱ्याला झेंडू फुलांना प्रचंड मागणी असते. त्यामुळे दरवर्षी कर्नाटक राज्यातून डिचोलीत प्रचंड प्रमाणात झेंडू फुलांची आवक होत असते. यंदा गुरुवारी (ता. २ ऑक्टोबर) दसरा (Dussehra) साजरा होत आहे. दसऱ्याला जेमतेम एक दिवस असल्याने आजपासून कर्नाटकातून डिचोलीत झेंडू फुलांची आवक सुरु झाली आहे. आज (मंगळवारी) तर डिचोलीत मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील झेंडू फुलांची आवक झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार आज मंगळवारी एकाच दिवशी कर्नाटकमधून डिचोलीत पाच टनांहून अधिक फुलांची आवक झाली आहे. उद्यापर्यंत ही आवक वाढण्याची शक्यता आहे.

८० ते १०० रुपये दर!

गेल्यावर्षी दसऱ्याला झेंडू फुलांचे दर २०० रुपये किलो असे होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा झेंडू फूले स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहेत. आज मंगळवारी झेंडूची फुले ८० ते १०० रुपये किलो या दराने विकण्यात येत होती. आवक वाढली की, झेंडू फुलांचे दर आवाक्यात राहण्याची शक्यता आहे. यंदा कर्नाटकात (Karnataka) झेंडू फुलांना समाधानकारक बहर आला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत आवक वाढण्याची शक्यता आहे. आवक वाढली की, झेंडू फुलांचे दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे, असे एक फूलविक्रेता बचपन हवंगी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT