Bicholim: कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला, तर खबरदार..! मुख्यमंत्र्यांनी दिला सज्जड इशारा

CM Pramod Sawant: डिचोली येथे झालेल्या बौद्धिक चर्चासत्रात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
CM Pramod Sawan
CM Pramod SawanDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: काहीजण क्षुल्लक कारणांवरून कायदा हातात घेण्याची धमकी देत आहेत. अशा धमक्यांना सरकार भीक घालत नाही, असे स्पष्ट करतानाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा जर कोणी प्रयत्न केला, तर खबरदार..! अशा लोकांची सरकार अजिबात गय करणार नाही. त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

डिचोली येथे झालेल्या बौद्धिक चर्चासत्रात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘जीएसटी’मध्ये केलेली सुधारणा, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना आरक्षण, मुंडकार प्रश्न, शिक्षण आदी क्षेत्रातील निर्णयाबाबत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवड्यानिमित्त येथील शेट्ये प्राईड सभागृहात आयोजित केलेल्या या बौद्धिक चर्चासत्रास राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, भाजपचे सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळकर, प्रा. गोविंद पर्वतकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, शंकर चोडणकर, महेश सावंत आदी उपस्थित होते.

CM Pramod Sawan
Goa Roads: "रस्त्यावर खड्डा दिसला की फोन करा, 24 तासांत दुरुस्त करतो", मंत्री कामतांनी दिली गोवेकरांना Guarantee

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताची विकसित देशांमध्ये गणना होत आहे. भारत देशाचा अनेक राष्ट्रांनी धसका घेतला आहे, असे सदानंद शेट तानावडे यांनी सांगून भारत देशाला ‘नंबर वन’ करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन केले. प्रेमेंद्र शेट यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

CM Pramod Sawan
Goa Crime: बायणात महिलेचा गळा चिरून खून, कारण अस्‍पष्‍ट; घटनेनंतर खुनी तेथेच बसला होता आरामात

मान्यवरांचा सन्मान

याप्रसंगी वैद्यकीय, कायदा, संगीत आदी सामाजिक क्षेत्रात योगदान दिलेल्या डिचोली, साखळी आणि मये मतदारसंघातील मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अंशिका नाईक हिने म्हटलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.

डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी प्रास्ताविकपर भाषणात हे चर्चासत्र आयोजित करण्यामागील हेतू स्पष्ट केला. विश्वास गावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी आभार मानले.

२०३७ पर्यंत गोवा बनणार स्वयंपूर्ण

राज्यात खाण व्यवसाय सुरू करण्यात सरकार यशस्वी ठरले असून २०२७ पर्यंत खनिज वाहतुकीशी संबंधित राज्यातील एकही ट्रक बंद राहणार नाही आणि कामगारही बेरोजगार राहणार नाहीत. २०४७ पर्यंत भारत देशाला महासत्ता बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्धार केला असून डबल इंजिन सरकारमुळे २०३७ पर्यंत गोवा स्वयंपूर्ण राज्य बनणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com