bullfight case Goa Dainik Gomantak
गोवा

Bull Fight Arrest: 'धीरयो'च्या रक्तरंजित खेळात मुक्या प्राण्याचा बळी; वार्कामधील दोन्ही मालकांना अटक

Dhiryos in Goa: वार्का आणि आगशी येथील बैलांमध्ये खुल्या शेतात झालेल्या झुंजीमध्ये वार्का येथील बैलाला गंभीर दुखापत झाल्यानंतर कोलवा पोलीस स्थानकात याबद्दल तक्रार दखल करण्यात आली होती

Akshata Chhatre

मडगाव: सुरवली येथे आयोजित केलेल्या बेकायदेशीर झुंजीच्या प्रकरणात वार्का येथील एका बैलाचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही बैलांच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. २८ एप्रिल रोजी वार्का आणि आगशी येथील बैलांमध्ये खुल्या शेतात झालेल्या झुंजीमध्ये वार्का येथील बैलाला गंभीर दुखापत झाल्यानंतर कोलवा पोलीस स्थानकात याबद्दल तक्रार दखल करण्यात आली होती.

बैलांच्या झुंजीत गंभीर जखमी झालेल्या वार्का येथील बैलाच्या शरीरावर आणि मानेवर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि झुंजीनंतर थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकम सिंह यांनी या घटनेची पुष्टी केली असून, सहभागी व्यक्तींविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरतेच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही बैलांच्या मालकांना ताब्यात घेतले आहे. या बेकायदेशीर झुंजीचे आयोजन कोणी केले होते आणि यात आणखी कोण सहभागी होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

बैलांचा जीव धोक्यात घालून अशा प्रकारे झुंजी आयोजित करणे कायद्याचे उल्लंघन आहे आणि यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या घटनेमुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

धीरयोच्या या खेळात ३० लाख रुपयांचा सट्टा लावण्यात आला होता. यावेळी बैलाचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच जमलेल्यांची तारांबळ उडाली. बैलांची झुंज सुरु असतानाचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता आणि तिथे अनेक उपस्थिती देखील पाहायला मिळत होती.

बैलांची झुंज सुरु असताना एक बैल अधिक आक्रमक झाला व दुसऱ्या बैलावर जोरदार प्रहार केला आणि यातच दुसरा बैल गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या या बैलाचा मृत्यू झाल्याने खळबळ निर्माण झाली आणि पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करत ताबडतोब तपास सुरु केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT