Buffalo stucked in pothole in Honda IDC Dainik Gomantak
गोवा

कंपनीचा निष्काळजीपणा मुक्या प्राण्यांच्या जीवावर

म्हैस खड्ड्यात पडली, होंडा आयडीसीमधील स्वानसन प्लास्टिक कंपनीतील प्रकार

दैनिक गोमन्तक

वाळपई : होंडा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या स्वानसन प्लास्टिक इंडिया कंपनीच्या बेफिकीर सुरक्षा यंत्रणेमुळे परिसरातून फिरणाऱ्या मुक्या जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सदर कंपनीने पाळीव जनावरांना कंपनीच्या आवारात प्रवेश मिळू नये यासाठी सुरक्षित उपाय योजना आखण्याकडे पुर्ण पणे दुर्लक्ष केले असल्याचं दिसून आलं आहे. गुरुवारी रात्री भुईपाल भेडशेवाडा येथिल एका शेतकऱ्यांची म्हैस कंपनीच्या आवारात असलेल्या एका खोल खड्ड्यात पडून जखमी झाल्याने कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सदर कंपनीचे एका बाजूने सुरक्षा कुंपण मोडल्याने चरायला गेलेल्या म्हशीतील (Buffalo) एक म्हशीने कंपनीच्या आवारात प्रवेश केला. मात्र त्याठिकाणी उघड्या अवस्थेत असलेल्या एका खोलवर खड्ड्यात पडून म्हैस गंभीर जखमी झाली आहे. सदर म्हशीला वाळपई अग्निशमन दलाच्या सहकार्याने एका खासगी क्रेनची मदत घेऊन वर काढलं असलं तरीही या घटनेत म्हैस जखमी झाली आहे.

कंपनीच्या आवारात घुसलेली म्हैस खोल असलेल्या खड्ड्यात जोरात पडल्याने तिच्या पाठीमागच्या भागाला गंभीर दुखापत झाली आहे. कंपनीच्या (Company) बाजूने असलेली सुरक्षा व्यवस्था बरोबर नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यापूर्वी कंपनीच्या व्यवस्थापनाला सुरक्षा यंत्रणेसंबंधी माहिती देण्यात आली होती, परंतु याप्रकरणी कंपनीने दुर्लक्ष केल्याने एक मुक्या जनावरांचा प्राण धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. खड्ड्यात पडलेल्या म्हशीवर होंडा पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांकडून (Doctor) उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT