Goa Businessmans  Dainik Gomantak
गोवा

Goa News: अर्थसत्ता दर्शविणारा अर्थसंकल्प; उद्योजकांचा सूर

Voice of Industry and Trade budget 2024 -2025: उद्योग क्षेत्रासाठीही हा सकारात्मक अर्थसंकल्प असल्याचे टॅक्सेशन समितीचे रोहन भंडारे यांनी सांगितले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: यंदाचा अर्थसंकल्प प्रामुख्याने गरीब, युवा, अन्नदाता शेतकरी आणि महिला सशक्तीकरणावर भर देणारा आहे. भारताला तिसरी जागतिक अर्थसत्ता बनविण्याच्या दृष्टिकोन असणारा, त्या अनुषंगाने महत्त्वाचे पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत आयसीआय गोवाचे अध्यक्ष मिलिंद शिरोडकर यांनी व्यक्त केले.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स येथे आयोजित व्हॉईस ऑफ इंडस्ट्रीज ॲण्ड ट्रेड बजेट २०२४-२५ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योजक राल्फ डिसोझा, प्रतिमा धोंड, रोहन भंडारे, स्वप्निल दीक्षित आदी उपस्थित होते.

यंदाचा अर्थसंकल्प हा विकसित भारताची वाटचाल दाखविणारा अर्थसंकल्प असून युवा, उद्योग, सामान्य नागरिकांचा विचार करत मांडलेला अर्थसंकल्प असून उद्योग क्षेत्रासाठीही हा सकारात्मक अर्थसंकल्प असल्याचे टॅक्सेशन समितीचे रोहन भंडारे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने कराच्या अनुषंगाने चांगले निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या करामध्येही बदल करण्यात आल्याने हा अर्थसंकल्प एकाअर्थी सर्वसमावेशक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत हा सर्वात युवा देश आहे. त्यामुळे कौशल्यपूर्ण युवा आणि रोजगार निर्मितीचे सरकारसमोर आव्हान आहे त्या अनुषंगाने अनेक निर्णय घेण्यात आले असून अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने अनेक नव्या गोष्टी घडतील अशी आशा व्यक्त करत असल्याचे राल्फ डिसोझा यांनी सांगितले.

सर्वांगीण विकासाला मदत

द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या गोवा शाखेद्वारे अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले आहे. गेल्या दशकात सरकारने केलेल्या सुधारणांचे हे बजेट अत्यंत सकारात्मक सूचक आहे. इंडस्ट्रियल पार्क गोव्यात येत असेल तर ते स्वागतार्ह पाऊल ठरेल. कामगार आणि तांत्रिक सुधारणांद्वारे व्यवसायाच्या संधी वाढवून सर्वांगीण विकासाला अर्थसंकल्प मदत करेल, असे संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल दीक्षित यांनी सांगितले.

महिला सशक्तीकरणाला वाव

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला सशक्तीकरणाच्या अनुषंगाने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. येत्या काळात महिलांच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केली जाईल. उद्योग क्षेत्रात अनेक महिला आता पुढाकार घेत आहेत. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. सौर ऊर्जा, साधनसुविधा निर्मितीच्या अनुषंगाने देखील हा उत्तम अर्थसंकल्प आहे, परंतु यावर सविस्तर अभ्यास केल्यावरच योग्य त्या निर्णयापर्यंत पोहोचू शकू, असे उद्योजक प्रतिमा धोंड यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT