Shivani and His Father Dainik Gomantak
गोवा

Vasco Accidental Death: मृत शिवानीचा भाऊ, वडिलांना जबानी देण्यासाठी केले पाचारण

Vasco Accidental Death: नवेवाडे - वास्को येथील शिवानी राजावत आणि तिची आई जयदेवी चौहान यांचा गॅस स्फोटात झालेला मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप शिवानीच्या भावाने आणि वडिलांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

Vasco Accidental Death: नवेवाडे - वास्को येथील शिवानी राजावत आणि तिची आई जयदेवी चौहान यांचा गॅस स्फोटात झालेला मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप शिवानीच्या भावाने आणि वडिलांनी केला आहे.

त्यामुळे त्यांना पत्र पाठवून जबानी देण्यासाठी पोलिस स्थानकात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

शिवानीच्या मृत्यूप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती वास्कोचे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली.

या घटनेनंतर गोवा पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागाने तेथे तपासणी केली आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

शिवानीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे तिचा पती अनुराग राजावत याचीही चौकशी केली जात आहे.

फ्लॅटमध्ये गॅसगळती कशी झाली, याचाच तपास सुरू आहे. गॅस सिलिंडर जसेच्या तसे आहे.

त्यामुळे गॅस गळती मुद्दाम कोणी केली की, अनवधानाने गॅस सुरू राहिला आणि तो पेटवताना फ्लॅटमध्ये जमा झालेल्या गॅसचा भडका उडाला, याची माहिती गॅस कंपनीच्या तज्ज्ञांकडून मिळवली जात आहे.

सध्या याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून जे समोर येईल, त्यानुसार तपासकामाची दिशा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT