Arambol Accident Dainik Gomantak
गोवा

Arambol Accident: कारच्या दरवाज्याला धडकून रस्त्यावर कोसळले अन् अंगावरुन गेला ट्रक; हरमलमधील भावांचा दुर्दैवी अंत

घटनेमुळे हरमल गावावर शोककळा पसरली असून, शिवजयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Pramod Yadav

Arambol Accident

हरमल येथे झालेल्या भीषण अपघातात भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.17) समोर आली. कारच्या दरवाज्याला धडकून खाली पडल्याने दोघांच्या अंगावरुन ट्रक गेल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते.

उपचारादरम्यान साहिल आणि दीप नाईक यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हरमल गावावर शोककळा पसरली असून, शिवजयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

साहिल नाईक याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्याच्या काही वेळानंतर बांबोळी येथील उपचाराधीन असलेल्या दीपचा देखील मृत्यू झाला.

भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हरमल गावावर शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी शिवजयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

असा घडला अपघात

स्विफ्ट कारचा दरवाजा मध्येच उघडल्याने दुचाकीवरील दोन भावांची दरवाज्याला धडक बसून ते रस्त्यावर कोसळले. रस्त्यावर कोसळलेल्या दोघांच्या अंगावरुन ट्रक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कार चालकानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता.

चालक ताब्यात, गावकऱ्यांचा पोलिस स्थानकावर मोर्चा

अपघातातील कार चालकाला पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी मांद्रे पोलिस स्थानकावर मोर्चा काढला असून, संशयितांना पोलिस स्थानकात घेऊन येण्याची मागणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT