Danielle McLaughlin  Dainik Gomantak
गोवा

Danielle McLaughlin : प्रलंबित डॅनियल खून खटल्याला गती द्या!

ब्रिटीश, आयरिश दूतावासाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

आयरिश बॅगपॅकर डॅनियल मॅक्लॉगलीन हिच्या खून खटल्याला गती देण्याची मागणी ब्रिटिश आणि आयरिश दुतावासाने केली आहे. 14 मार्च 2017 मध्ये 28 वर्षीय डॅनियल राजबाग-काणकोण होळीसाठी आली असता तिच्या एका स्थानिक मित्र विकट भगत याने बलात्कार करत तिची हत्या केली होती.

या घटनेला बराच काळ लोटूनही हा खटला मडगाव न्यायालयात फक्त प्राथमिक अवस्थेतच रेंगाळलेला आहे. यावर ब्रिटिश आणि आयरिश दुतावासाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

ब्रिटिश आणि आयरिश डिप्लोमॅट्सनी गुरुवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत ही सुनावणी प्राधान्याने घेण्याची विनंती केली. ब्रिटीश उपउच्च आयुक्त ॲलन गेमेल, कॉन्सुल जनरल ऑफ आयर्लंड अनिता यांनी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या प्रकरणात न्यायालयाने त्वरीत निर्णय द्यावा, असे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी जेमेल आणि केली यांनी यापूर्वीही 9 जून 2022 रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. हा खटला लवकर निकाली काढून संशयिताला शिक्षा व्हावी, असे डॅनियलच्या आईचे म्हणणे आहे.

चेंडू सरकारच्या ‘कोर्टात’

खटल्यावरील सुनावणी पूर्ण करून त्यावर निष्कर्ष काढणे हे ब्रिटीश व आयरिश सरकार, डॅनियलच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे आहे. घटनेला सहा वर्षे होत आली तर तिच्या कुटुंबीयाला न्याय मिळालेला नाही.

खटला सध्या न्यायप्रविष्ट असल्याने पोलिस यंत्रणा त्यात काहीच करू शकत नाही. राज्य सरकारच या प्रकरणावर जलदगतीने निवाडा देण्यासाठी प्रकरण जलदगती न्यायालयाकडे वर्ग करू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT