पणजी : एमजी मोटर इंडिया या ब्रिटिश ऑटोमोबाईल ब्रँडने आपल्या एमजी कॉमेट इव्ही या दुसऱ्या विद्युत वाहनाचे सादरीकरण केले. या वाहनाची प्रारंभी किंमत 7.98 लाख (एक्स शोरूम) अशी आहे आणि तिचा मासिक चार्जिंग खर्च रू. 519 एवढा असल्याची माहिती एका प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.
प्रशस्त अशा डिझाईनची ही गाडी 4 आसनी आहे आणि शहरात सुरळीत, तणावविरहीत प्रवास करण्यासाठी ती आरामदायी अशी आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना व्यवस्थापकीय संचालक परिंद नाचिनोलकर यांनी सांगितले की, गोव्यातील रस्त्यांचा वापर करणाऱ्यांसाठी ही गाडी योग्य अशी आहे.
गोव्याच्या आवश्यकतांसाठी ही गाडी योग्य अशी असल्याचे ते म्हणाले. सीईओ आश्विन परेरा म्हणाले की सध्याच्या वाढलेल्या इंधन किमतींमुळे गोव्यातील रस्ते वापरणाऱ्यांसाठी एमजी कॉमेट इव्ही हे वाहन योग्य आहे. कॉमेट इव्ही शुध्द इलेक्ट्रिक जीएसइव्ही प्लॅटफॉर्मवर उभारण्यात आली आहे.
या गाडीने जागतिक पातळीवर सर्वात वेगाने १ दशलक्ष वाहन विक्री पूर्ण केली आहे. शैलीदारपणाबरोबरच तंत्रज्ञानाबाबतही ही कार दर्जेदार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षेच्या बाबतीतही ही कार वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे ते म्हणाले. टेस्ट राईडसाठी शोरूममध्ये येण्याचे आवाहन परेरा यांनी केले आहे.
या वाहनाच्या बॅटरीच्या सुरक्षिततेसाठी ३९ कडक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ही एमजी कॉमेट इव्ही कार हाय स्ट्रेंग्थ बॉडीची आहे. या कारला ड्युअल एअर बॅग्स, रिअर पार्किंग कॅमेरा तसेच आयोसोफिक्स चाईल्ड सीट अशीही वैशिष्ट्ये आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.