Heartwarming animal rescue story Dainik Gomantak
गोवा

Dog friendship: ही दोस्ती तुटायची नाय! पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला दुसरा कुत्रा धावला मदतीला म्हणून प्राण वाचला

Leopard attack Goa News: बिबट्याने झडप घालुन कुत्र्याला फरफटत नेले. यावेळी घरातील दुसऱ्या कुत्र्याने बिबट्यावर हल्ला केला. बिबट्याने पकडलेल्या कुत्र्याला सोडून जंगलात पळ काढला.

Pramod Yadav

मुक्या प्राण्यांमध्ये देखील प्रेम, भावना आणि मदतीची वृत्ती असते याची प्रचिती देणारे अनेक प्रसंग वारंवार समोर आले आहेत. गोव्यातून देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्याने घरातील एका पाळीव कुत्र्यावर हल्ला केला व फरफटत नेले याचवेळी घरातील दुसरा कुत्रा त्याच्या मदतीला धावला आणि त्याची सुटका केली. कुळे शिगाव पंचायत क्षेत्रातील कॅनलवाडा येथे रात्री ८-३० वाजता ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुळे शिगाव पंचायत क्षेत्रातील कॅनलवाडा येथील नितेश नाईक यांच्या पाळीव कुत्रा अंगणात बसलेला असता त्याच्यावर रात्री ८-३० वाजता बिबट्याने झडप घालुन त्याला फरफटत नेले. यावेळी घरातील दुसऱ्या कुत्र्याने बिबट्यावर हल्ला केला. बिबट्याने पकडलेल्या कुत्र्याला सोडून जंगलात पळ काढला.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेला कुत्रा

दरम्यान, पकडलेल्या कुत्रा जखमी झाला असुन त्याच्या गळ्याला दात व अंगाला नखे ओरबडली आहेत. घडलेला सर्व प्रकार वन खात्याला कळविले असता त्यांनी या ठिकाणी येऊन पहाणी करुन सिसिटिव्ही कॅमेरा कार्यान्वित केला आहे.

मदतीला धावलेला हाच तो कुत्रा

जखमी कुत्र्यावर घरगुती उपचार घर मालकाने केला आहे. दरम्यान, यापूर्वी येथे बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर हल्ला करुन त्यांना ठार केल्याच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या स्थानिकांनी बिबट्याचा बंदोबस्त वन खात्याने करावा अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तवडकरांना मिळाली गावडेंकडे असलेली सर्व खाती, 'आदिवासी कल्याण'ही पाहणार; कामतांकडे PWD, आणखी 2 मंत्र्यांना मिळाली 2 खाती

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

Goa Live Updates: जम्मू परिसरात दिवसात 380 मिमी पाऊस

Modak Significance: गणरायाला का प्रिय आहे मोदक? काय सांगते पुराण? वाचा महत्व..

Ganesh Festival: बौद्ध-जैन धर्मीयांनाही मान्य असलेले दैवत, गणपतीबाप्पाचे सर्वधर्मीय आकर्षण

SCROLL FOR NEXT