Goa Crime: तोतया पोलिसांनी घातला 4 लाखांना गंडा, धर्मापूर येथील घटना; पोलिसांकडून धरपकड सुरु

Goa Police Scam: धर्मापूर येथील राष्ट्रीय हमरस्तावर दोन भामट्यांनी मूळ कारवार जिल्ह्यातील मुर्डेश्वर येथील श्रीधर मोगेर या मासळीवाहू वाहनचालकाला अडवून पोलिस असल्याची बतावणी केली.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पोलिस अधिकारी असल्याचे भासवून एका मासळीवाहू वाहनाच्या चालकाला लुबाडणाऱ्या त्या दोन भामट्यांचा सध्या शोध सुरू आहे. मडगाव पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी ही केली. मात्र त्यांचा या घटनेची संबंध नसल्याचा आढळून आले आहे.

बुधवारी (ता. ७) भरदिवसा  शिरली, धर्मापूर येथील राष्ट्रीय हमरस्तावर दोन भामट्यांनी मूळ कारवार जिल्ह्यातील मुर्डेश्वर येथील श्रीधर मोगेर या मासळीवाहू वाहनचालकाला अडवून पोलिस असल्याची बतावणी केली व वाहन चालकाकडे असलेली ४ लाख ८३ हजार रोकड  घेउन पोबारा केला होता.

Crime News
Goa Crime: पोलीस अधिकारी बनून आले, मासळी वाहनचालकाला लुटले; धर्मापूरात भरदिवसा भामट्यांनी पळवले 4.8 लाख

मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय वेळीप पुढील तपास करीत आहेत. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे सीसीटीव्ही कॅमेराही नसल्याने पोलिस तपासात अडचणी येत आहे. तक्रारदाराने संशयितांचे वर्णन केले आहे. त्याआधारे पोलिस पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Margao Jewelers Murder Case
Goa Crime Branch Investigation
Gautam Khattar
Fake ED Officer Arrested
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com