ST Reservation Dainik Gomantak
गोवा

Goa ST Reservation : ...अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

मिशन फॉर पॉलिटिकल रिझर्वेशन : ‘एसटी’ समाजाला आरक्षण द्या

दैनिक गोमन्तक डिजिटल

2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण जाहीर केले नाही तर एसटी समाजाकडून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल.

समाजातील काहीजण निवडणुकीवर बहिष्कार टाकणार नसल्याचे सांगत आहेत, ते चुकीचे असून एसटी समाज आपल्या मतावर ठाम आहे, असे प्रतिपादन मिशन फॉर पॉलिटिकल रिझर्वेशन संघटनेचे अध्यक्ष ॲड. जॉन फर्नांडिस यांनी सांगितले.

संघटनेच्या पणजी कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रूपेश वेळीप, रवींद्र वेळीप, रामा काणकोणकर, कॉस्तातिनो फालेरो व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आम्हाला एसटी समाज तसेच विविध संघटनांचा पूर्ण पाठिंबा असून आम्ही गाव पातळीवर जागृती करत आहोत. 13 एप्रिल रोजी मडगाव येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत एसटी समाजातील विविध 14 संघटना तसेच समाजातील जिल्हा पंचायत सदस्य तसेच पंच यांच्या उपस्थितीत दोन ठराव घेण्यात आले. त्यात राजकीय आरक्षण न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणे तसेच गाव पातळीवर जागृती करणे यांचा समावेश आहे.

आमदारांवरही दबाव

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेच्या 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचे विधान केले. त्याचीच ‘री’ एसटी समाजाचे सभापती रमेश तवडकर, मंत्री गोविंद गावडे, आमदार गणेश गावकर, आंतोनियो वाझ हे ओढत आहेत, अशी टीका यावेळी करण्यात आली.

मडकईकरांचे विधान चुकीचे

17 एप्रिल रोजी एसटी समाजाचे नेते तथा जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर आणि सुरेश केपेकर जे भाजपशी संबंधित आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी समाज लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार नसल्याचे सांगितले. ते चुकीचे आहे.

मडगावातील बैठकीत धाकू मडकईकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी या निर्णयाला विरोध केला नाही. परंतु मडकईकरांनी पक्षीय दबावाला बळी पडून चुकीची विधाने करू नयेत, असे रूपेश वेळीप म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT