Valpoi News : सत्तरी तालुक्यात क्रेझ केवळ दशावताराचीच...!

रसिकांवर मोहिनी आजही कायम : ‘दत्तमाऊली’ दशावतारी मंडळाचे सर्वच कलाकार कंपनी मालक
Drama
DramaDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi : सत्तरी तालुक्यात गेल्या शेकडो वर्षापासून दशावतार नाटके बघण्याची परंपरा आहे. आजच्या मोबाईल, फेसबुक, टीव्ही या जमान्यातही सत्तरी तालुक्यातील रसिकांनी दशावतारी नाटकाला आपलेसे केले आहे. पूर्वीप्रमाणे आजही दर्दी रसिक सत्तरीत असून बॉलिवूड, हॉलिवूडची नव्हे तर दशावतारीचीच क्रेझ असल्याचे बिंबल सत्तरी येथे 17 एप्रिल रोजी सिंधुदुर्गच्या दत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला नाट्यमंडळाने सादर केलेल्या नाट्यप्रयोगावेळी आढळून आले.

महाराष्ट्रात जत्रा व खास करून उत्तर गोव्यात मंदिरांचे कालोत्सव म्हटले, की दशावतार नाटके आयोजित केली जातात. सत्तरी तालुक्यात आजही या दशावतारी नाटकांची मोठी चलती पहावयास मिळते. अभ्यासू कलावंत दत्तप्रसाद शेणई, रामचंद्र रावले, सीताराम मयेकर व सहकलाकारांनी एका पेक्षाहून दमदार भूमिका साकारत दशावतारी नाटकात रोमांच आणला.

Drama
Valpoi News : दीप्ती जोशी यांचे फणसाचे चिप्स, पापड पोहचले विदेशात

दत्तमाऊली कंपनीचे अध्यक्ष बाबा मयेकर यांनी सांगितले तीन वर्षा अगोदर काही निवडक कलाकार एकत्र आलो होतो. व या कंपनीची नवी सुरुवात दत्त कृपेने केली होती. कंपनीला धावे गावचे दीपक जोशींनी नाव दिले होते. कंपनीचे सर्वच कलाकार मालक आहेत, सर्वांना समान मोबदला दिला जातो. कंपनीने लोकांच्या मनोरंजनाबरोबरच सामाजिक सेवेचे भान ठेवून आतापर्यंत समाजातील काही गरजूंना आर्थिक मदत केली आहे.

गरिबांना आरोग्याच्या उपचारावेळी पैसा नसतो. अशावेळी उपचारासाठी कंपनीला मिळालेल्या मोबदल्यातील काही रक्कम उपचारासाठी दिली आहे. चांगली नाटके रसिकांसमोर सादर करणे हेच आमचे ध्येय आहे. आमची नाटके शास्त्राला धरूनच असतात. तो कटाक्ष बाळगला आहे. बिंबल येथे कलाकारांना नाटकाच्या शेवटपर्यंत खिळवून ठेवले होते.

Drama
Valpoi : लाइनमननी सेवा देताना अत्यंत सावधगिरी बाळगावी ; अभियंता तुळशीदास पळ

कलाकारांची मिळकत तुटपंजीच !

दशावतार सादर करणारे कलावंत ही कला सादर करण्‍याचे कसब एकलव्‍याप्रमाणे स्‍वतः शिकतात. त्‍यांना कुणाकडूनही तालीम मिळत नाही. काही वर्षांपूर्वी दशावतार सादर करणाऱ्या मोजक्याच कंपन्या होत्या, पण अलीकडे यात बऱ्यापैकी भर पडली आहे व कंपन्यांची मोहिनी रसिकांवर आजही सत्तरीत कायम आहे.

रसिकांना वर्षांनुवर्षे आपल्या अभिनयाची मोहिनी घालणाऱ्या दशावतारी कलाकारांची या कलेतून मिळणारी आर्थिक मिळकत मात्र तुटपुंजीच आहे. मात्र असे असूनही कलाकार कलेच्या श्रद्धेपोटी निष्ठेने काम करीत आहेत.

लिखित संवाद नसूनही गोंधळ नाही

पुराणातील विविध पुस्तके यांचे वाचन केले जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा कोकणच्या मातीत कोकणी माणसानं आजमितीपर्यंत आवर्जून जपलेला आहे. दशावतार हे त्याचे ठळक उदाहरण आहे. तो कोकणी माणसाचा सांस्कृतिक ठेवा आहे. कर्नाटकचा यक्षगान व कोकणचा दशावतार यात बरेचसे साम्य आहे.कथानकातील पात्रे रंगमंचावर स्वत:चे संवाद बोलत असतात. इथे दखल घेण्याजोगी बाब म्हणजे लिखित संवाद नसूनही रंगमंचावर दोन किंवा तीन पात्रे एकत्र असूनही त्यांचा आपापसातील संवादाचा गोंधळ झाला नाही.

Drama
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांत घट, दक्षिण गोव्यात वाढ; जाणून घ्या आजचे दर

दशावतारी नाटकातून कलाकार भक्तीमार्ग दाखवतात. कलियुगात भक्ती मार्गच तारणारा आहे. म्हणूनच दशावतारी लोककलेचे संवर्धन करणे फारच गरजेचे आहे. सत्तरीत आजही ही नाटके बघणारी मंडळी वाढत आहेत. विशेषतः ट्रिकसीन युक्त नाटके छाप पाडतात.

भालचंद्र भाटेकर, रसिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com