Borim Road Accident Dainik Gomantak
गोवा

'गोव्यात हे काय चाललंय'? आधी बाईकला धडक दिली, नंतर अंगावर गाडी घालायचा केला प्रयत्न; चालक गंभीर जखमी

Borim Road Accident: वाडी येथील लवूकांत नाईक (वय ४४) याने आपण चालवत असलेल्या कारगाडीची धडक समोरून येणाऱ्या ब्रह्मानंद नाईक (वय ४०) तळावली येथे राहणाऱ्या इसमाच्या दुचाकीला दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: वाडी- बोरी रस्त्यावर एकाने कार दुचाकीला धडकवून दुचाकीस्वाराच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला.

वाडी येथील लवूकांत नाईक (वय ४४) याने आपण चालवत असलेल्या कारगाडीची धडक समोरून येणाऱ्या ब्रह्मानंद नाईक (वय ४०) तळावली येथे राहणाऱ्या इसमाच्या दुचाकीला दिली. या धडकेनिशी ब्रह्मानंद रस्त्यावर फेकला गेला, त्यानंतर लवूकांत नाईक याने ब्रम्हानंदच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.

पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असून ब्रह्मानंद नाईक हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलिसांनी लवूकांत नाईक याला अटक केली असून त्याच्या जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. फोंडा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

एनडीपीएस प्रकरणात सशर्त जामीन मंजूर

अंमलीपदार्थ विरोधी कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या एका संशयिताला अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी, न्यायालयाने संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला होता मात्र, ताज्या सुनावणीत वैद्यकीय स्थिती आणि उच्च न्यायालयाचे दाखले लक्षात घेत हा निर्णय देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT