Borim Gun Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Borim: बंदूक साफ करायला गेला, अचानक दाबला गेला ट्रिगर; गोळी लागून बोरीतील व्यक्ती गंभीर जखमी

Borim Gun Fire Incident: घरात ठेवलेल्या शस्त्रास्त्रांची काळजीपूर्वक हाताळणी करावी आणि योग्य सुरक्षितता उपायांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बोरी परिसरात जुनी बंदूक साफ करताना घडलेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. तिशे–बोरी येथील पंकज प्रभाकर नाईक (वय ४१) हे घरातील जुनी बंदूक स्वच्छ करण्याचे काम करत होते. यावेळी अनवधानाने बंदुकीचा ट्रिगर दाबला गेल्याने अचानक गोळी सुटली आणि ती त्यांच्या पायात घुसली.

घटनेनंतर घरात एकच गोंधळ उडाला. गोळी लागल्यामुळे पंकज यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी फोंडा आयडी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) येथे हलविण्यात आले.

या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून सोमवारी फोंडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. बंदूक परवानाधारक होती का, तसेच ती कार्यरत अवस्थेत का ठेवण्यात आली होती, याबाबतही चौकशी केली जात आहे.

दरम्यान, पंकज नाईक यांची प्रकृती सध्या स्थिर असून उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घरात ठेवलेल्या शस्त्रास्त्रांची काळजीपूर्वक हाताळणी करावी आणि योग्य सुरक्षितता उपायांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT