Bori Dainik Gomantak
गोवा

Bori News : बुथ कार्यकर्त्यांनी कसली कंबर : शिरोडकर

Bori News : प्रत्येक कार्यकर्ता तळागाळात जाऊन भाजपचा प्रचार करत असून पल्लवी धेंपे याचा विजय हा शंभर टक्के ठरलेला आहे, असे प्रतिपादन जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Bori News :

बोरी, शिरोडा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना आघाडी मिळवून देण्यासाठी शिरोड्यातील बुथ समितीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

प्रत्येक कार्यकर्ता तळागाळात जाऊन भाजपचा प्रचार करत असून पल्लवी धेंपे याचा विजय हा शंभर टक्के ठरलेला आहे, असे प्रतिपादन जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

रविवार ७ रोजी बोरी पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या मतदारसंघातील बुथ समित्या व प्रमुख कार्यकर्त्यांच्या सभेत शिरोडकर बोलत होते. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, सरपंच सतीश नाईक, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, सरचिटणीस अवधूत नाईक, मिनानाथ उपाध्ये, परिमल सामंत, विनय गावकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सदानंद शेट तानावडे म्हणाले, की प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या बुथसमित्या आणि कार्यकर्त्यांनी सतर्क राहून अधिकाधिक मतदारांना भाजपकडे आकर्षित करून भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे तसेच श्रीपाद नाईक यांना विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या खेपेला पंतप्रधान करून देशाबरोबरच गोव्याचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करण्याचे आवाहन केले. या खेपेला राज्यातील दोनही

उमेदवार निवडून येतील हे आता निश्‍चित झाले आहे. असेही शेट तानावडे म्हणाले.

यावेळी मिनानाथ उपाध्ये, परिमल सामंत, अवधूत नाईक यांची भाषणे झाली. सरपंच सतीश नाईक यांनी स्वागत केले तर सूरज नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठे यश; पाचजणांना अटक, हल्ल्याचे कारण येणार समोर?

Ankola Road Accident: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! अंकोलाजवळ बस आणि टँकरची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार, पाच जखमी

Rama Kankonkar Assault: 'दोषींना सोडणार नाही...' रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; कठोर कारवाईचे दिले निर्देश

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

SCROLL FOR NEXT