Bori  Dainik Gomantak
गोवा

Bori News : अहिल्याबाईंसारखे आदर्श व्यक्तिमत्त्व मनामनात : प्रा. अनिता तिळवे

Bori News : वारखंडे फोंडा येथे होळकर जयंती साजरी

गोमन्तक डिजिटल टीम

Bori News :

बोरी, बाणेदार तडफदार, कर्तव्यकठोर अन तितक्याच प्रजावत्सल अहिल्याबाई होळकर यांच्या विविध स्मृती आजही (२२५ वर्षानंतरही) आपल्या मनात तितक्याच आत्मियतेने टिकून आहेत, याचे कारण त्यांचे व्यक्तिमत्व, असे प्रतिपादन डॉ. प्रा. अनिता तिळवे यांनी केले.

त्या धार्मिक वृत्तीच्या तर होत्याच पण दूरदृष्टी असलेल्या उत्तम राज्यप्रशासकही होत्या. आयुष्यात स्वतः खूप दुःख भोगूनही त्यांचे प्रशासन मात्र निष्कलंक, धवलशुभ्र असे होते. साधी राहणी आणि तत्वाची वागणूक हे त्यांचे गुणविशेष. त्यांना स्वतःला राजकारणाची उत्तम जाण होती, असे आदर्श असलेले व्यक्तिमत्व आपण कायम स्मरणात ठेवले पाहिजे, असे तिळवे यांनी सांगितले.

प्रागतिक विचार मंच गोवातर्फे ३१ मे रोजी वारखंडे फोंडा येथे पुण्यश्‍लोकी अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी डॉ. प्रा. तिळवे, बाबूश पारकर, मनोहर तिळवे, महेश पारकर, मुकुंद कामत, नरहरी नाईक, राया बोरकर,आनंद पेडणेकर, शाणुदास सावंत, नागेश प्रभु, विनोद नाईक, संस्थेचे अध्यक्ष जयवंत आडपईकर, चंद्रकांत बांदिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. तिळवे यांनी होळकर यांचे जीवनकार्य उलगडून दाखवले. रमेश वंसकर यांनी सूत्रसंचालन केले. महेश पारकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT