CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: 'गोव्यातील मतदारांकडे पोचून समस्या जाणून घेता येतील', CM सावंतांचा ‘बूथ चलो अभियाना’त सहभाग

Booth Chalo Abhiyan Goa: पाळी पचायत क्षेत्रातील बूथ क्र. ४८ ला मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन लोकांशी संवाद साधला तसेच मार्गदर्शनही केले.

Sameer Panditrao

साखळी: भाजप पक्षातर्फे साखळी मतदारसंघात राबविण्यात आलेल्या बूथ चलो अभियानात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीचे आमदार या नात्याने सक्रिय सहभाग घेतला आहे.

पाळी पचायत क्षेत्रातील बूथ क्र. ४८ ला मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन लोकांशी संवाद साधला तसेच मार्गदर्शनही केले. मुख्यमंत्र्यांचे या बूथवर जोरदार स्वागत करण्यात आले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेली देशहितार्थ कामे, देशात आणि गोव्यात झालेला विकास, भाजप सरकारची अकरा वर्षे इत्यादी विषयांवर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला.

तसेच लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या कार्यक्रमात सरपंच संतोष नाईक, मंडळ अध्यक्ष रामा नाईक, बूथ क्र ४८ चे अध्यक्ष संजय शेठ व स्थानिक मतदारांची उपस्थिती होती.

‘बुथ चलो अभियान’ संपूर्ण राज्यात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने घेतलेली उंच भरारी प्रत्येक मतदाराला कळावी याच हेतूने आम्ही गोव्यात ‘बुथ चलो अभियान’ हा खास कार्यक्रम राबवणार आहोत. त्यामुळे सर्व मतदारांकडे पोचता येईल. त्यांच्या समस्या जाणून घेता येतील. यात आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: Goa Rain: पुन्हा पावसाचा इशारा!

SCROLL FOR NEXT