Bondla Zoo Dainik Goomantak
गोवा

Bondla Zoo: बोंडला प्राणीसंग्रहालय आठ दिवसांत सर्वांसाठी होणार खुले; देविया राणेंची महत्वाची माहिती

Bondla Zoo Reopening: १५ एप्रिल रोजी प्राणी क्वारंटाईनचा कालावधी समाप्त झाला आहे. तरी देखील पुढील काही दिवस बोंडला बंद ठेवण्यात येणार आहे.

Pramod Yadav

पणजी: तीन उदमांजर आणि दोन रान मांजरांचा संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बोंडला प्राणीसंग्रहालय बंद करण्यात आले होते. दरम्यान, बोंडला आठ दिवसांत सुरु करण्यात येईल, असे संकेत गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GFDC) च्या अध्यक्षा देविया राणे यांनी दिले आहेत. ०१ एप्रिल रोजी बाेंडला नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते.

६ ते ९ मार्च या कालावधीत तीन उदमांजर आणि दोन रानमांजरांचा मृत्यू झाला. रान मांजरांना एव्हिएन इन्फ्युएन्जा झाल्याचे तपासणीत समोर आले होते. दरम्यान, उदमांजरांचा मृत्यू कशामुळे झाला? याची माहिती समोर आलेली नाही.

यानंतर ०१ एप्रिल रोजी प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आले होते. यानंतर संग्रहालयातील प्राण्यांना १५ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, १५ एप्रिल रोजी क्वारंटाईनचा हा कालावधी समाप्त झाला आहे. तरी देखील पुढील काही दिवस बोंडला बंद ठेवण्यात येणार आहे.

प्राण्यांच्या आजाराबाबत संशोधन करणाऱ्या भोपाळ येथील संस्थेकडून आवश्यक चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दुसऱ्यांदा खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा नमूने तपासले जाणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

पहिल्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आला असून, दुसऱ्या चाचणीचा अहवाल देखील नकारात्मक आल्यानंतर पुढील आठ दिवसांत बोंडला सुरु करण्याचा मानस आहे, अशी माहिती देविया राणे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.

प्राणी संग्रहालयातील प्राणी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करुन बोंडला बंद ठेवण्यात आले होते. पोल्ट्रीमधील पक्षांचे देखील रक्ताचे नमूने घेऊन तपासण्यात आले. विषाणूचा संसर्ग तपासण्यासाठी खबरदारी म्हणून ही चाचणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. या पक्षांचा अहवाल आणि बाेंडला येथील प्राण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT