Bondla Sanctuary Dainik Gomantak
गोवा

Bondla Sanctuary: प्रतिक्षा संपली! बोंडलामध्ये दिसणार 'अस्‍वल' आणि 'हरीण'; छत्तीसगड, महाराष्‍ट्रातून होणार आगमन

Bondla Sanctuary News: राज्‍यातील एकमेव बोंडला प्राणी संग्रहालयात लवकरच अस्‍वल आणि हरीण यांच्‍या जोड्यांचे आगमन छत्तीसगड आणि महाराष्‍ट्रातून होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्‍यातील एकमेव बोंडला प्राणी संग्रहालयात लवकरच अस्‍वल आणि हरीण यांच्‍या जोड्यांचे आगमन छत्तीसगड आणि महाराष्‍ट्रातून होणार आहे. त्‍या बदल्‍यात बोंडलाकडून या राज्‍यांतील अभयारण्‍यांना गवे आणि रानमांजर यांची जोडी देण्‍यात येणार आहे. भारतीय वन्‍यजीव मंडळानेही त्‍यासाठी मान्‍यता दिली आहे, अशी माहिती वन खात्‍याच्‍या सूत्रांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’ला दिली.

बोंडला प्राणी संग्रहालयात नवे प्राणी आणण्‍याची प्रक्रिया वन खात्‍याने काही वर्षांपूर्वी केली आहे. त्‍याच काळात जगभरासह गोव्‍यातही कोविड विषाणूने थैमान घातला. त्‍यामुळे ही प्रक्रिया त्‍यावेळी थांबवण्‍यात आली होती. मध्‍यंतरीच्‍या काळात खात्‍याने पुन्‍हा या प्रक्रियेला गती दिली होती.

पण, प्राणी संग्रहालयातील विकासकामांमुळे पुन्‍हा या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला होता. त्‍यानंतर खात्‍याने पुन्‍हा यासाठी प्रयत्‍न सुरू केले होते. अखेर या प्रयत्‍नांना यश मिळाले असून, भारतीय वन्‍यजीव मंडळाने छत्तीसगड आणि महाराष्‍ट्रातून गोव्‍यात अस्‍वल आणि हरणाची जोडी पाठवण्‍यास आणि त्‍याबदल्‍यात गोव्‍यातून छत्तीसगडला गवे आणि महाराष्‍ट्राला रानमांजराची जोडी देण्‍यास मान्‍यता दिली आहे.

पावसामुळे पर्यटक संख्‍येत घट

मान्‍सून हंगाम संपल्‍यानंतर बोंडला प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्‍या संख्‍येत वाढ होत असते. यंदा मान्‍सून संपल्‍यानंतरही पाऊस पडतच असल्‍याने गेल्‍या काही दिवसांत प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकांच्‍या संख्‍येत घट झाली. परंतु, पाऊस संपताच पर्यटकांच्‍या प्रमाणात निश्‍चित वाढ होईल, असा विश्‍‍वास एका अधिकाऱ्याने व्‍यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT