Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Bondla Zoo Closure: बोंडला प्राणी संग्रहालय महिनाभर बंद ठेवणे भोवणार? IFS अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरु

Bondla Wildlife Sanctuary: वन विभागामध्ये अशा प्रकारचे निष्काळजीपणाचे वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बोंडला प्राणी संग्रहालय महिनाभर बंद ठेवल्याच्या प्रकरणात आता मोठी कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. संबंधित प्रकरणात वन्यजीव विभागाचे संरक्षक आणि बोंडला प्राणी संग्रहालयाचे प्रभारी अधिकारी आयएफएस नवीन कुमार यांच्याविरोधात विभागीय स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या चौकशीदरम्यान संपूर्ण बंदच्या कालावधीत एकदाही प्राणी संग्रहालयास भेट न दिल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यामागील कारण म्हणजे, बोंडला येथे विविध प्रजातींच्या पाच रानमांजरांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्राणी संग्रहालय बंद ठेवले होते.

मात्र, एवढ्या गंभीर स्थितीतही संबंधित अधिकाऱ्याने स्वतः तिथे भेट न देणे, तसेच सरकारला माहिती न देणे, हे अतिशय गंभीर आणि शासकीय कामकाजाच्या नियमांना धाब्यावर बसविणारे आहे. या प्रकरणात आगामी काळात अजून काही अधिकारीही चौकशीत अडकण्याची शक्यता आहे. वन विभागामध्ये अशा प्रकारचे निष्काळजीपणाचे वर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, प्रत्येक प्रकरणात पारदर्शकतेने व जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.

केंद्राला अहवाल पाठविणार

वनमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता आणि मान्यताही न घेता प्राणी संग्रहालय बंद ठेवणे, ही गंभीर बाब आहे. संबंधित अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा नोटीस' बजावण्यात आली असून, सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT