Bondla Zoo Dainik Goomantak
गोवा

Bondla Zoo Goa: प्राण्यांचा चाचणी अहवाल रखडला, बोंडला प्राणी संग्रहालय गेल्या अडीच महिन्यांपासून बंद

Bondla Wildlife Sanctuary Goa: मार्च ६ ते ९ दरम्यान तीन सिव्हेट मांजरी आणि दोन जंगल मांजरींचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संग्रहालय बंद करण्याचा निर्णय विभागाने घेतला होता.

Pramod Yadav

Bondla Wildlife Sanctuary Goa

सत्तरी: गोव्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असलेले बोंडला वन्यजीव प्राणी अभयारण्य गेल्या अडीच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्राण्यांचा चाचणी अहवाल रखडल्यामुळे अभयारण्य खुले करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थेत प्राण्यांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

वनविभागाचे कमल दत्ता यांनी टाईम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली असून, जूनच्या सुरुवातीला नमूने भोपाळला पाठवल्याचे त्यांनी सांगितले.

चाचणीचा अहवाल लवकरच येणे अपेक्षित असून, अहवाल नकारात्मक आल्यास राज्य सरकारशी चर्चा करुन अभयारण्य खुले करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बोंडला प्राणी संग्रहालय १ एप्रिल रोजी तात्पुरते बंद करण्यात आले होते. मार्च ६ ते ९ दरम्यान तीन सिव्हेट मांजरी आणि दोन जंगल मांजरींचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संग्रहालय बंद करण्याचा निर्णय विभागाने घेतला होता.

मृत जंगल मांजरापैकी दोन प्राण्यांमध्ये एच५एन१ या एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग आढळून आला होता, तर सिव्हेट मांजरींच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

प्राण्यांच्या मृत्यूनंतर ३० मार्चला अधिकाऱ्यांनी तातडीने बोडला बंदी आदेश जारी करत प्राणी संग्रहालयात १५ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी लागू केला होता, जो १५ एप्रिल रोजी संपला होता. दरम्यान, प्राण्यांचे चाचणी अहवाल अद्याप समोर आले नसल्याने प्राणी संग्रहालय पुन्हा खुले करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.

प्राण्यांच्या पहिल्या फेरीतील तपासणीचा निकाल नकारात्मक (नेगेटिव्ह) आला आहे. दुसऱ्या फेरीतील तपासणीचे नमुने भोपाळला पाठविण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT