Bondla Wildlife Sanctuary Dainik Gomantak
गोवा

Bondla Sanctuary In Goa: केंद्र सरकारची मंजुरी; ‘बोंडला’ बनविणार आणखी आकर्षक!

बोंडला अभयारण्याची मास्टर प्लॅनद्वारे विकास योजना राबवू, असे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Bondla Wildlife Sanctuary In Goa: गोमंतकीय आणि देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेले बोंडला प्राणिसंग्रहालय अर्थात अभयारण्य आता अधिक आकर्षक होणार आहे. वन विभागाकडून सादर केलेल्या संग्रहालयाच्या मास्टर प्लॅनला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री भूपेंद्र यादव यांनी मंजुरी दिली आहे.

त्यामुळे धोरणात्मक आणि संवर्धनात्मत उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. या मास्टर प्लॅनद्वारे योग्य दृष्टीकोनातून एकात्मिक विकासाच्या योजना राबवू, असे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

मुंबईतील भायखळा प्राणिसंग्रहालया प्रमाणेच पर्यटक आणि स्थानिकांना आकर्षित करणारे बोंडला हे एक अनोखे ठिकाण बनविणे हे आमचे ध्येय आहे. प्राणिसंग्रहालयाला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी इतर राज्यांकडून प्राणी, पक्षी आणि इतर सजीवांच्या काही प्रजाती घेण्याचा विचार आहे.

वन्यजीवांसाठी चांगल्या भविष्याच्या दिशेने बोंडलाला सर्वसमावेशक मास्टर प्लॅन बनविण्याबाबत उत्तर गोव्याचे वन्यजीव, पर्यावरण आणि पर्यटन उपवनसंरक्षक आनंद जाधव, सीसीएफ सौरव कुमार आणि साहाय्यक वनसंरक्षक व वन्यजीव परेश पोरोब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

दिल्ली भेटीत केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडून बोंडलासंबधी मास्टर प्लॅन मंजूर करून घेतला आहे, असे मंत्री राणे म्हणाले.

मकाऊ, वाघांची प्रतीक्षा

बोंडला अभयारण्यात अमेरिकन मकाऊ पक्षी आणि दोन वाघांचे दर्शन लवकरच होणार आहे. यासाठीचा वन विभागाचा प्रस्ताव प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजूर यापूर्वीच केला आहे. सध्‍या इथे गवे, बिबटे, सांबर, चितळ, वन मांजर, अस्वल, कोल्हे आदींसह सापांच्या काही जाती तर काही विदेशी पक्षी असे 151 जातीचे विविध प्राणी, पक्षी आहेत.

राज्यातील सर्व वन्यजीव अभयारण्यांपैकी बोंडला अभयारण्य हे सर्वात लहान आहे. मुले, कुटुंबे आणि पर्यावरणीय पर्यटकांमध्ये ते सर्वांत लोकप्रिय आहे. एका दिवसाच्या सहलीसाठी हे एक आदर्श पर्यटनस्थळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT