Manohar International Airport: 'टॅक्सी बॅच रद्द करण्याचे षडयंत्र सरकारचेच'

सरकारने टॅक्सी बॅच रद्द करण्याचे षडयंत्र आखले आहे. तसे झाल्यास गोमंतकीयांचा हातातून टॅक्सी व्यवसाय निसटून तो परप्रांतीयाकडे जाईल, असे सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले.
Manohar International Airport
Manohar International AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Manohar International Airport: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले तरी तेथे टॅक्सी सेवेबाबत गोंधळ सुरूच आहे. दुसरीकडे नेटवर्क नसल्याने पर्यटकांना गोवा टॅक्सी ॲपचा वापर करण्यात अडचणी येत आहेत. खासगी टॅक्सी कंपन्यांनी पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून टॅक्सी सुविधा पुरवण्याचे आश्‍वासन दिले आहे.

त्यामुळे सरकारने टॅक्सी बॅच रद्द करण्याचे षडयंत्र आखले आहे. तसे झाल्यास गोमंतकीयांचा हातातून टॅक्सी व्यवसाय निसटून तो परप्रांतीयाकडे जाईल. त्यामुळे ही धोक्याची घंटा समजून टॅक्सीचालकांनी जागृत व्‍हावे, असे आवाहन टॅक्‍सीचालक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी केले.

राज्य सरकारने या विमानतळावर उतरणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्‍या जातील असे सांगितले असले तरी गेल्या काही दिवसांत पर्यटकांना टॅक्सी आरक्षण करण्यासाठी नेटवर्कच मिळेनासे झाल्याने ते हैराण झाले आहेत. विमानतळाच्या जीएमआर कंपनीला पर्यटकांना टॅक्सी उपलब्ध करून देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Manohar International Airport
Manohar International Airport: टॅक्‍सीचालकांकडून अर्जांची होळी

गोवा टॅक्सी ॲप तसेच जीटीडीसीच्या ॲपमध्ये अनेक टॅक्सी नोंदणीकृत असल्याचे सांगितले तरी त्‍या नोंद झालेल्‍या नाहीत. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विमानतळावर ताज काऊंटरला परवानगी दिली आहे.

बेरोजगार युवक सरकारी नोकरी मिळत नाहीत म्हणून टॅक्सी व्यवसायाकडे वळले तरी त्यांना या व्यवसायात सरकारकडून म्हणावे तसे साहाय्य मिळत नाहीय. उलट या ठिकाणी ओला व उबेर या कंपन्यांच्या टॅक्सी आणण्याचा प्रयत्न मागील दाराने सुरू आहे, असा आरोप ताम्‍हणकर यांनी केला.

Manohar International Airport
Pilerne Fire: ‘बर्जर बेकर’ कंपनीवर गुन्हा नोंदवून 100 कोटी वसूल करा'

टॅक्सी संघटनेला बैठकीतून वगळले

अलीकडेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावरील सोयीसुविधांबाबत उडालेल्या गोंधळाबाबत बैठक घेतली. त्यावेळी टॅक्सी संघटनेला विश्‍वासात न घेता खासगी टॅक्सी ॲपच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते.

टॅक्सी बॅच सक्तीचा आहे. त्यामुळे गोव्यातील पारंपरिक टॅक्सीव्यवसाय हा परप्रांतियाच्या हाती गेलेला नाही. मात्र एकदा हा बॅच रद्द झाला की टॅक्सीव्यवसाय धोक्यात येऊन परप्रांतीय टॅक्सीचालक टॅक्सी ॲप कंपन्या गोव्यात आणतील, असा दावा ताम्‍हणकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com