Bondla Zoo Dainik Goomantak
गोवा

Bondla Sanctuary: बोंडला प्राणी संग्रहालय बुधवारपासून खुले होणार? विषाणूच्या संसर्गामुळे होते बंद; चाचणी निकाल प्रतीक्षेत

Bondla Zoo Reopening: मृत जंगल मांजरापैकी दोन प्राण्यांमध्ये एच५एन१ या एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग आढळून आला होता, तर सिव्हेट मांजरींच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असलेल्या बोंडला वन्यजीव अभयारण्यमधील प्राणी संग्रहालय ३० एप्रिलपासून पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुले होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बोंडला प्राणी संग्रहालय १ एप्रिल रोजी तात्पुरते बंद करण्यात आले होते. मार्च ६ ते ९ दरम्यान तीन सिव्हेट मांजरी आणि दोन जंगल मांजरींचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संग्रहालय बंद करण्याचा निर्णय विभागाने घेतला होता.

यानंतर त्वरीत उपाययोजना केल्या गेल्या. मृत जंगल मांजरापैकी दोन प्राण्यांमध्ये एच५एन१ या एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग आढळून आला होता, तर सिव्हेट मांजरींच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार या मृत्यूंनंतर ३० मार्चला अधिकाऱ्यांनी तातडीने बोडला बंदी आदेश जारी करत प्राणी संग्रहालयात १५ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी लागू केला होता, जो १५ एप्रिल रोजी संपला. तरीही, पूर्ण खात्री होईपर्यंत प्राणी संग्रहालय पुन्हा खुले करण्यात आले नव्हते.

अधिकृत घोषणा लवकरच

सध्या भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्था या संस्थेमार्फत बोंडला येथील नमुन्यांची ‘डबल कन्फर्मेशन’ तपासणी सुरू आहे. पहिल्या फेरीतील तपासणीचा निकाल नकारात्मक (नेगेटिव्ह) आला आहे. दुसऱ्या फेरीतील तपासणीचे नमुने नुकतेच भोपाळला पाठविण्यात आले असून, त्याचा निकाल काही दिवसांत अपेक्षित आहे. दुसरी चाचणीही नकारात्मक आल्यास बोंडला प्राणी संग्रहालय ३० एप्रिल रोजी सर्वसामान्यांसाठी उघडले जाईल. याबाबत अधिकृत घोषणाही लवकरच अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT