Panjim Municipality Dainik Gomantak
गोवा

Panjim Municipality: मांस व चिकन विक्रेत्यांसाठी सहा आठवड्यांत पर्यायी जागा उपलब्ध करण्याचा आदेश जारी!!

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: पणजीत मच्छीमार्केट परिसरातील इमारत जमीनदोस्त करण्यात आलीये आणि यानंतर इथे व्यवसाय करणाऱ्या मांस व चिकन विक्रेत्यांसाठी येत्या सहा आठवड्यांत नवीन पर्याय उपलब्ध करून द्यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (गोवा) जारी केला आहे. यापूर्वी देखील न्यायालयात तीनवेळा पर्यायी जागे संदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मुस्ताक हुसेन आणि इतर मंडळींनी या याचिकांमधून गोवा राज्य सरकार, महानगरपालिका, मामलेदार आणि तलाठी यांच्याविरोधात प्रतिवाद केले होते.

पणजी महानगरपालिकेने मच्छीमार्केट परिसरातील इमारत धोकादायक असल्याचे सांगतात दुकानदारांना ३ जानेवारी २०२४ रोजी नोटीस पाठवली होती. पुढे नोटीसला विरोध करत दुकानदारांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पणजी महापालिकेने १३ ऑगस्ट २०२४ रोजी आदेश जारी करत २१ ऑक्टोबर पर्यंत इमारत सील केली आणि यानंतर इमारत जमीनदोस्त करण्याचे काम सुरु झाले.

इमारत जमीनदोस्त होत असताना देखील याचिकादारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून दोन्ही बाजू ऐकून घेल्यानंतर आता नवीन इमारत बांधून तयार होईपर्यंत सहा आठवड्याच्या कालावधीत दुकानदारांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: कॅलिफोर्नियासारखा होणार मुंबई - गोवा सुपरहायवे; 26,000 कोटींच्या मरीन महामार्गाचे काम सुरु

Chief Justice Dr. D. Y. Chandrachud: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा गोवा दौरा; मेरशीतील जिल्हा व सत्र न्यायालय संकुलाचे केले उद्घाटन

Goa Todays Live Update: टाउट्स विरोधी मोहिमेंतर्गंत कळंगुट पोलिसांची 29 जणांवर कारवाई !

Goa News: पाणीपातळी वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया! गोव्यातील किनारपट्टींचा अभ्यास सुरू

Borim News: तीन वर्षात बोरी पूल उभा राहिल! मैदानाचीही मागणी पूर्ण करू; मंत्री शिरोडकरांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT