Sunil Gudlar Case Dainik Gomantak
गोवा

Sunil Gudlar Case: निलंबित PI गुडलर आणि हवालदार हुसेनल दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

Sunil Gudlar Bail Granted: PI सुनील गुडलर व पोलिस शिपाई संशयित मोहम्मद हुसेन हरिहर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्यांनी धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने गुरूवारी (८ मे) त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

Sameer Amunekar

पणजी : लाचप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक संशयित सुनील गुडलर व पोलिस शिपाई संशयित मोहम्मद हुसेन हरिहर या दोघांना मडगाव सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर वेगवेगळे अर्ज सादर करत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्यांनी धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने गुरूवारी (८ मे) त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

मडगाव रेल्वे पोलिस स्थानकाचे निरीक्षक खंडणीबहाद्दर सुनील गुडलर व हवालदार महम्मद हुसेन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना अटक केल्याने त्या दोघांनाही पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.

बेळगाव येथील एका मटण व्यापाऱ्याला गोव्यात मांस पुरवठा केल्याच्या खोट्या प्रकरणात फसवून त्याच्याकडून दोन लाखांची खंडणी व दरमहा २५ हजार रुपये हफ्त्याची मागणी केल्याप्रकरणी या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ एप्रिल रोजी त्यांना अटक केली होती.

गुडलरची वादग्रस्त कारकीर्द

अवैध बीफ आणि लाच प्रकरणावरुन मडगाव कोकण रेल्‍वेचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर अडचणीत सापडले होते. याआधी याच प्रकरणात २०१० साली गुडलर अडकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Migration: 5 वर्षांत 'इतक्या' गोमंतकीयांकडून भारतीय नागरिकत्‍वाचा त्‍याग; 99 % लोकांनी निवडले 'पोर्तुगाल'

Gautam Gambhir: "टीका करा, मी पर्वा करत नाही"! सोशल मीडिया ट्रोलिंगवरून गंभीरचे रोखठोक मत; बांधिलकी संघाशी असल्याचे प्रतिपादन

Amit Patkar: वाढदिनी पाटकर धरणे आंदोलनात! मिराबागवासीयांना दिला पाठिंबा; राज्य सरकारवर केली टीका

Mirabag: '..आमचा संगमेश्वर कायमचाच पाण्याखाली जाईल'! मीराबाग बंधाऱ्याला सांगेवासीयांचाही विरोध; सरकारला दिला इशारा

Suryakumar Yadav Retirement: 'रिटायर होणार का'? कॅप्टन सूर्याने दिले पहिल्यांदाच उत्तर; हसत हसत म्हणाला की....

SCROLL FOR NEXT