Bombay High Court Goa Bench Diniak Gomantak
गोवा

Goa Crime: नराधम कार क्लिनरची 10 वर्षांची सक्तमजुरी कायम! उच्च न्यायालयाचा पीडितेच्या बाजूने मोठा कौल; आरोपीची फेटाळली याचिका

Bombay High Court Goa Bench : फ्लॅटमध्ये घुसून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी कार क्लिनर आल्फ्रेड फर्नांडिस (३८) याला सुनावलेली दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा गोवा खंडपीठाने कायम ठेवली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: फ्लॅटमध्ये घुसून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी कार क्लिनर आल्फ्रेड फर्नांडिस (३८) याला सुनावलेली दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा गोवा खंडपीठाने कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल योग्य ठरवत आरोपीची याचिका फेटाळून लावली.

ही घटना १४ ते १५ मे २०२३ च्या मध्यरात्री घडली होती. एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पीडित महिलेच्या बेडरूममध्ये आरोपीने मध्यरात्री प्रवेश केला. पीडित महिला ब्युटी पार्लर चालवते. तिच्या साक्षीनुसार, तिला जाग आली तेव्हा आरोपी जमिनीवर रांगत होता. तिने आरडाओरडा करताच आरोपीने तिला उशीने दाबण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. झटापटीदरम्यान पीडितेने धाडस दाखवत आरोपीच्या गळ्यातील साखळी ओढली, जी तिथेच तुटून पडली. घरमालक आणि शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला बाल्कनीतून ताब्यात घेतले.

दरम्यान, न्यायालयाने आरोपीला आयपीसी कलम ३७६ अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, कलम ३५४ अंतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, तर कलम ४४८ अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या असून, दंडाची रक्कम वसूल झाल्यास ती पीडितेच्या मदतीसाठी दिली जाणार आहे.

न्यायालयाचे स्पष्ट मत

१ ऑक्टोबर २०२४ रोजी पणजी येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने आरोपीला आयपीसी कलम ३७६, ३५४ आणि ४४८ अंतर्गत दोषी ठरवले होते. या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, २०१३ च्या कायद्यातील दुरुस्तीनुसार योनीमार्गात बोटे किंवा कोणतीही वस्तू घालणे हेही बलात्काराच्या व्याख्येत येते. यासाठी शारीरिक संबंधाची तीव्रता सिद्ध करणे आवश्यक नसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Property Fraud: 5 लाखांत फ्लॅटचे स्वप्न दाखवले, 250 जणांना 4 कोटींचा गंडा; आरोपी उत्तर प्रदेशात अटकेत

Tourist Robbery: 'एस्कॉर्ट सर्व्हिस'च्या बहाण्याने पर्यटकाची लूट, रोशनीविरुद्ध न्यायालयाचा मोठा निर्णय

Jennifer Barreto Miss Universe 2026: प्यूर्टो रिकोने रचला इतिहास! 75व्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत जेनिफर बॅरेटोने पटकावले विजेतेपद; मायभूमीतच मिळवले यश VIDEO

Jewellery Robbery: ओळखीचा फायदा घेत 75 वर्षीय वृद्धेला लुटले; सीसीटीव्हीमुळे महिला जेरबंद, 5 लाखांचे दागिने जप्त

Women Employment Schemes:16 सरकारी खाती, 60 योजना अन् 24 प्रशिक्षण संस्था; महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी

SCROLL FOR NEXT